S M L

संसाराचा भार 700 कोटींचा !

31 ऑक्टोबरजगाच्या लोकसंख्येनं आज 7 अब्ज म्हणजेच 700 कोटींचा आकडा ओलांडला आहेत. जगातल्या 700 कोटीव्या बाळानं नेमका कुठे जन्म घेतला याची अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे. भारतात सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात जगातल्या 700 कोटीव्या बाळानं जन्म घेतल्याची घोषणा प्लॅन इंटरनॅशनल या एनजीओ (NGO)नं केली. लखनौपासून 20 किलोमीटर अंतरावर मालमध्ये अजय आणि विनिता या दांपत्याच्या मुलीनं सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी जन्म घेतला. तिचं नाव नर्गिस असं ठेवलंय. दरम्यान, फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये रविवारच्या मध्यरात्री एका मुलीनं जन्म घेतला. डानिका मे कामाचू असं तिचं नाव ठेवण्यात आलंय. संयुक्त राष्ट्राच्या अधिकार्‍यांनी त्या मुलीची आणि तिच्या आईवडिलांची भेट घेतली आणि त्यांना केक दिला. तर तिथल्या स्थानिक प्रशासनाने मुलीच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप आणि पालनपोषणासाठी काही रक्कमही मंजूर केली. तर वाढती लोकसंख्या भारतासाठी एक मोठं आव्हान आहे. लोकसंख्येला आळा घालण्यासाठी सरकार कुटंबनियोजनाचा आधार घेतंय. पण येत्या काही काळात भारतापुढची समस्या वेगळीच असेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 2030 मध्ये भारत सर्वाधिक तरुणांचा देश होईल. पण त्यानंतर जननदर कमी झाल्यानं वृद्धांची संख्या वाढणार आहे. ताजमहालशिवाय भारत जगात आणखी कोणत्या गोष्टीसाठी ओळखला जात असेल तर ते म्हणजे झपाट्यानं वाढत असलेली लोकसंख्या. जगाच्या वाढत्या लोकसंख्येत भारतचं योगदान खूप मोठं आहे. सोमवारी जगाची लोकसंख्या 7 अब्ज झाली त्यात भारताची लोकसंख्या आहे तब्बल 121 कोटी. लोकसंख्येच्या बाबतीत भारत आपला प्रतिस्पर्धी चीनशी स्पर्धा करत आहे. इतकंच नाही तर भारतातली काही राज्यं जगातल्या मोठमोठ्या देशांनाही मागे टाकत आहेत. या स्थितीचा सामना कसा करायचा हा प्रश्न आहे.पण 2050 पर्यंत भारतासमोर एक वेगळंच आव्हान असेल. एकीकडे भारताची लोकसंख्या वाढतेय हे खरं असलं तरी कमी मुलांना जन्म देण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात 15 ते 24 वर्षं वयोगटातल्या तरुणांची संख्या कमी होईल. आणि वृद्धांची संख्या वाढेल. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार...सन 2000 मध्ये 6.7% वृद्ध दुसर्‍यांवर अवलंबून होते 2025 मध्ये ही संख्या 11 टक्के होईल 2050 मध्ये ही संख्या 19 टक्के होईल तर 2075 मध्ये दुसर्‍यावर अवलंबून असणार्‍या वृद्धांची संख्या 27 टक्के होईल. वाढती लोकसंख्या अनेक संकंटं घेऊन येणार आहे. जी राज्य विकासात मागं पडत आहेत, त्यांच्या त्रासात अधिक भर पडणार आहे. वाढती लोकसंख्या देशातल्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या समस्या निर्माण करणार आहे. देशातल्या काही भागात स्त्रीभ्रूण हत्यांमुळे मुलींची संख्या घटतेय. त्यामुळे अनेक सामाजिक समस्याही निर्माण होत आहे. यांचा सामना करणं हे भारतासमोरचं मोठं आव्हान असेल.आव्हान वाढत्या लोकसंख्येचं- सध्या भारत आणि चीनमध्ये जगातील एक तृतियांपेक्षा जास्त लोक राहतात- भारताची लोकसंख्या 121 कोटी, तर चीनची लोकसंख्या 134 कोटी आहे- 2030 मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल - येत्या 25 वर्षांत भारताची लोकसंख्या तब्बल 35 कोटींनी वाढण्याची शक्यता - 2050 मध्ये भारताची लोकसंख्या चीनपेक्षा 20 कोटींनी जास्त असेल - 2030 पर्यंत भारताची कृतिशील लोकसंख्या जगात सर्वात तरुण असेल- भारताची लोकसंख्या 2060 पासून घटायला सुरू होईल - चीनची लोकसंख्या 2050 पासून घटायला सुरू होईल

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2011 05:26 PM IST

संसाराचा भार 700 कोटींचा !

31 ऑक्टोबर

जगाच्या लोकसंख्येनं आज 7 अब्ज म्हणजेच 700 कोटींचा आकडा ओलांडला आहेत. जगातल्या 700 कोटीव्या बाळानं नेमका कुठे जन्म घेतला याची अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे. भारतात सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात जगातल्या 700 कोटीव्या बाळानं जन्म घेतल्याची घोषणा प्लॅन इंटरनॅशनल या एनजीओ (NGO)नं केली.

लखनौपासून 20 किलोमीटर अंतरावर मालमध्ये अजय आणि विनिता या दांपत्याच्या मुलीनं सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी जन्म घेतला. तिचं नाव नर्गिस असं ठेवलंय. दरम्यान, फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये रविवारच्या मध्यरात्री एका मुलीनं जन्म घेतला. डानिका मे कामाचू असं तिचं नाव ठेवण्यात आलंय. संयुक्त राष्ट्राच्या अधिकार्‍यांनी त्या मुलीची आणि तिच्या आईवडिलांची भेट घेतली आणि त्यांना केक दिला. तर तिथल्या स्थानिक प्रशासनाने मुलीच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप आणि पालनपोषणासाठी काही रक्कमही मंजूर केली. तर वाढती लोकसंख्या भारतासाठी एक मोठं आव्हान आहे. लोकसंख्येला आळा घालण्यासाठी सरकार कुटंबनियोजनाचा आधार घेतंय. पण येत्या काही काळात भारतापुढची समस्या वेगळीच असेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 2030 मध्ये भारत सर्वाधिक तरुणांचा देश होईल. पण त्यानंतर जननदर कमी झाल्यानं वृद्धांची संख्या वाढणार आहे.

ताजमहालशिवाय भारत जगात आणखी कोणत्या गोष्टीसाठी ओळखला जात असेल तर ते म्हणजे झपाट्यानं वाढत असलेली लोकसंख्या. जगाच्या वाढत्या लोकसंख्येत भारतचं योगदान खूप मोठं आहे. सोमवारी जगाची लोकसंख्या 7 अब्ज झाली त्यात भारताची लोकसंख्या आहे तब्बल 121 कोटी. लोकसंख्येच्या बाबतीत भारत आपला प्रतिस्पर्धी चीनशी स्पर्धा करत आहे. इतकंच नाही तर भारतातली काही राज्यं जगातल्या मोठमोठ्या देशांनाही मागे टाकत आहेत. या स्थितीचा सामना कसा करायचा हा प्रश्न आहे.

पण 2050 पर्यंत भारतासमोर एक वेगळंच आव्हान असेल. एकीकडे भारताची लोकसंख्या वाढतेय हे खरं असलं तरी कमी मुलांना जन्म देण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात 15 ते 24 वर्षं वयोगटातल्या तरुणांची संख्या कमी होईल. आणि वृद्धांची संख्या वाढेल. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार...

सन 2000 मध्ये 6.7% वृद्ध दुसर्‍यांवर अवलंबून होते 2025 मध्ये ही संख्या 11 टक्के होईल 2050 मध्ये ही संख्या 19 टक्के होईल तर 2075 मध्ये दुसर्‍यावर अवलंबून असणार्‍या वृद्धांची संख्या 27 टक्के होईल.

वाढती लोकसंख्या अनेक संकंटं घेऊन येणार आहे. जी राज्य विकासात मागं पडत आहेत, त्यांच्या त्रासात अधिक भर पडणार आहे. वाढती लोकसंख्या देशातल्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या समस्या निर्माण करणार आहे. देशातल्या काही भागात स्त्रीभ्रूण हत्यांमुळे मुलींची संख्या घटतेय. त्यामुळे अनेक सामाजिक समस्याही निर्माण होत आहे. यांचा सामना करणं हे भारतासमोरचं मोठं आव्हान असेल.

आव्हान वाढत्या लोकसंख्येचं- सध्या भारत आणि चीनमध्ये जगातील एक तृतियांपेक्षा जास्त लोक राहतात- भारताची लोकसंख्या 121 कोटी, तर चीनची लोकसंख्या 134 कोटी आहे- 2030 मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल - येत्या 25 वर्षांत भारताची लोकसंख्या तब्बल 35 कोटींनी वाढण्याची शक्यता - 2050 मध्ये भारताची लोकसंख्या चीनपेक्षा 20 कोटींनी जास्त असेल - 2030 पर्यंत भारताची कृतिशील लोकसंख्या जगात सर्वात तरुण असेल- भारताची लोकसंख्या 2060 पासून घटायला सुरू होईल - चीनची लोकसंख्या 2050 पासून घटायला सुरू होईल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2011 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close