S M L

अधिवेशनात 'जनलोकपाल' आणलं नाही तर पुन्हा आंदोलन - अण्णा हजारे

01 नोव्हेंबरयेत्या हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल विधेयक आणलं नाही तर पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा जेष्ठ समाज सेवक अण्ण हजारे यांनी सरकारला दिला. अण्णांनी या संदर्भातलं पत्र पंतप्रधानांना लिहील आहे. यामध्ये जनलोकपाल विधेयक आणण्याच्या मागणीचा पुनरुच्चार अण्णांनी केला. विलासरावांसोबत पाठवलेल्या पत्रात पंतप्रधानांनी हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल आणण्यासंदर्भात मान्य केलं होतं. त्याप्रमाणे सरकारने हिवाळी अधिवेशनात विधेयक आणावं असं या पत्रात अण्णांनी म्हटलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसात अण्णा आपलं मौन सोडतील. आणि त्यानंतर तेदेशव्यापी दौरा करणार आहेत.दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावरील आरोपांनंतर टीम अण्णांनी आपल्या आंदोलनाबाबतचा ऑडिट रिपोर्ट सादर केला आहे. यामध्ये एप्रिल 1 ते सप्टेंबर 30 या कालावधीत रामलीला मैदानावरील देणगीतून जमा झालेली रक्कम ही 1 कोटी 14 लाख रुपये आहे. तर देशभरातील देणगीतून जमा झालेली रक्कम 2 कोटी 51 लाख इतकी आहे. ट्रस्टला एकूण 3 कोटी 50 लाख इतकी रक्कम देणगीरूपात मिळाली. पण देणगीदारांची माहिती उपलब्ध होऊ न शकल्यानं यासंर्भातला आयकर परतावा म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स दाखल होऊ शकलेला नाही. तसेच ट्रस्टने सभांच्या खर्चापोटी 52 लाख, जनजागरणासाठी 45 लाख, प्रवासासाठी 10 लाख आणि पत्रकार परिषदांवर 4.6 लाख रूपये खर्च केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2011 12:11 PM IST

अधिवेशनात 'जनलोकपाल' आणलं नाही तर पुन्हा आंदोलन - अण्णा हजारे

01 नोव्हेंबर

येत्या हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल विधेयक आणलं नाही तर पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा जेष्ठ समाज सेवक अण्ण हजारे यांनी सरकारला दिला. अण्णांनी या संदर्भातलं पत्र पंतप्रधानांना लिहील आहे. यामध्ये जनलोकपाल विधेयक आणण्याच्या मागणीचा पुनरुच्चार अण्णांनी केला. विलासरावांसोबत पाठवलेल्या पत्रात पंतप्रधानांनी हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल आणण्यासंदर्भात मान्य केलं होतं. त्याप्रमाणे सरकारने हिवाळी अधिवेशनात विधेयक आणावं असं या पत्रात अण्णांनी म्हटलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसात अण्णा आपलं मौन सोडतील. आणि त्यानंतर तेदेशव्यापी दौरा करणार आहेत.

दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावरील आरोपांनंतर टीम अण्णांनी आपल्या आंदोलनाबाबतचा ऑडिट रिपोर्ट सादर केला आहे. यामध्ये एप्रिल 1 ते सप्टेंबर 30 या कालावधीत रामलीला मैदानावरील देणगीतून जमा झालेली रक्कम ही 1 कोटी 14 लाख रुपये आहे. तर देशभरातील देणगीतून जमा झालेली रक्कम 2 कोटी 51 लाख इतकी आहे. ट्रस्टला एकूण 3 कोटी 50 लाख इतकी रक्कम देणगीरूपात मिळाली. पण देणगीदारांची माहिती उपलब्ध होऊ न शकल्यानं यासंर्भातला आयकर परतावा म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स दाखल होऊ शकलेला नाही. तसेच ट्रस्टने सभांच्या खर्चापोटी 52 लाख, जनजागरणासाठी 45 लाख, प्रवासासाठी 10 लाख आणि पत्रकार परिषदांवर 4.6 लाख रूपये खर्च केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2011 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close