S M L

अडवाणींच्या रथयात्रेचं राज्यात थंड स्वागत

02 नोव्हेंबरभ्रष्टाचाराविरोधात भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांची जनचेतना यात्रा आज महाराष्ट्रात पोहचली. अडवाणींनी आपल्या यात्रेदरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग आणि युपीए सरकारवर तोफेचा भडीमार केला. पण गर्दी खेचण्यात मात्र त्यांना यश आल्याचं दिसत नाही. विशेषतः दक्षिण भारतातल्या राज्यात अडवाणींच्या रथयात्रेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. भ्रष्टाचाराविरोधात देशभरात तयार झालेल्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी अडवाणींनी रथयात्रा सुरू केली. महाराष्ट्रात येण्यापूर्वी अडवाणींची यात्रा 15 राज्यातून फिरली. पण दक्षिण भारतात अडवाणींच्या यात्रेकडे मध्यमवर्ग, तरुणाई आणि मीडियानंही पाठ फिरवल्याचं दिसलं. कर्नाटकात येडियुरप्पा प्रकरणामुळे घायाळ झालेल्या प्रदेश भाजपकडून अडवाणींचं यात्रेचं थंड स्वागत झालं. त्यानंतर गोव्यात आलेल्या अडवाणींना स्थानिक नेत्यांचे मतभेद मिटवण्यासाठीच वेळ द्यावा लागला.खरंतर अडवाणींच्या यात्रेच्या हेतुबद्दल भाजप आणि संघातच साशंकता आहे. त्यामुळेच जनचेतना यात्रा स्वतःच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीसाठी नाही हे त्यांना वारंवार सांगावं लागतंय. ही यात्रा अडवाणी भाजप आणि निवडणुकांसाठी नाही. महाराष्ट्रात प्रदेश भाजपमधील भांडणं तर जगजाहीर आहेत. गडकरी मुंडे यांच्यातल्या नुकत्याच निवळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अडवाणी महाराष्ट्रात दाखल झालेले आहेत. त्यामुळे ओढून-ताणून का होईना राज्यातील भाजपचे नेते अडवाणींच्या सोबत एकत्र दिसत आहे. पण, तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत अडवाणींच्या यात्रेचा नेमका उद्देश पोचल्या नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.दरम्यान, अडवाणींच्या पुण्यात होणार्‍या सभेवर मुंडे-गडकरी गटाच्या वादाचं सावट आहे. पुण्यातल्या सभेची जय्यत तयारी झाली आहे. पण या तयारीमध्ये केवळ गडकरी गटाचे गिरीश बापट, शहराध्यक्ष विकास मठकरी आणि स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बीडकर हेच दिसत आहे. मुंडे गटाकडूनही अडवाणींचं सातारा रोडवरच्या शंकर महाराज मठाजवळ जोरदार स्वागत केलं जाणार आहे. तर, कात्रज चौकात आमदार भीमराव तापकीर हे अडवाणींचा सत्कार करतील, असं सांगून मुंडे गटाला गडकरी गटानं टोला मारला. त्यामुळे, खडकवासला निवडणुकीच्या प्रचारसभेत विकास मठकरी व्यासपीठावर असतील तर आपण जाणार नाही, अशी भूमिका घेणारे गोपीनाथ मुंडे उद्या होणार्‍या सभेत काय भूमिका घेतात याची चर्चा सुरू झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2011 05:32 PM IST

अडवाणींच्या रथयात्रेचं राज्यात थंड स्वागत

02 नोव्हेंबर

भ्रष्टाचाराविरोधात भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांची जनचेतना यात्रा आज महाराष्ट्रात पोहचली. अडवाणींनी आपल्या यात्रेदरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग आणि युपीए सरकारवर तोफेचा भडीमार केला. पण गर्दी खेचण्यात मात्र त्यांना यश आल्याचं दिसत नाही. विशेषतः दक्षिण भारतातल्या राज्यात अडवाणींच्या रथयात्रेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

भ्रष्टाचाराविरोधात देशभरात तयार झालेल्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी अडवाणींनी रथयात्रा सुरू केली. महाराष्ट्रात येण्यापूर्वी अडवाणींची यात्रा 15 राज्यातून फिरली. पण दक्षिण भारतात अडवाणींच्या यात्रेकडे मध्यमवर्ग, तरुणाई आणि मीडियानंही पाठ फिरवल्याचं दिसलं. कर्नाटकात येडियुरप्पा प्रकरणामुळे घायाळ झालेल्या प्रदेश भाजपकडून अडवाणींचं यात्रेचं थंड स्वागत झालं. त्यानंतर गोव्यात आलेल्या अडवाणींना स्थानिक नेत्यांचे मतभेद मिटवण्यासाठीच वेळ द्यावा लागला.

खरंतर अडवाणींच्या यात्रेच्या हेतुबद्दल भाजप आणि संघातच साशंकता आहे. त्यामुळेच जनचेतना यात्रा स्वतःच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीसाठी नाही हे त्यांना वारंवार सांगावं लागतंय. ही यात्रा अडवाणी भाजप आणि निवडणुकांसाठी नाही. महाराष्ट्रात प्रदेश भाजपमधील भांडणं तर जगजाहीर आहेत.

गडकरी मुंडे यांच्यातल्या नुकत्याच निवळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अडवाणी महाराष्ट्रात दाखल झालेले आहेत. त्यामुळे ओढून-ताणून का होईना राज्यातील भाजपचे नेते अडवाणींच्या सोबत एकत्र दिसत आहे. पण, तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत अडवाणींच्या यात्रेचा नेमका उद्देश पोचल्या नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.

दरम्यान, अडवाणींच्या पुण्यात होणार्‍या सभेवर मुंडे-गडकरी गटाच्या वादाचं सावट आहे. पुण्यातल्या सभेची जय्यत तयारी झाली आहे. पण या तयारीमध्ये केवळ गडकरी गटाचे गिरीश बापट, शहराध्यक्ष विकास मठकरी आणि स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बीडकर हेच दिसत आहे. मुंडे गटाकडूनही अडवाणींचं सातारा रोडवरच्या शंकर महाराज मठाजवळ जोरदार स्वागत केलं जाणार आहे.

तर, कात्रज चौकात आमदार भीमराव तापकीर हे अडवाणींचा सत्कार करतील, असं सांगून मुंडे गटाला गडकरी गटानं टोला मारला. त्यामुळे, खडकवासला निवडणुकीच्या प्रचारसभेत विकास मठकरी व्यासपीठावर असतील तर आपण जाणार नाही, अशी भूमिका घेणारे गोपीनाथ मुंडे उद्या होणार्‍या सभेत काय भूमिका घेतात याची चर्चा सुरू झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2011 05:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close