S M L

रिक्षांच्या अवाजवी भाड्यामुळे नागपूरकर त्रस्त

18 नोव्हेंबर, नागपूर प्रशांत कोरटकर महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये लोक प्रवासासाठी तीन चाकी ऑटोचा वापर करतात पण ऑटो मीटर असुनही इथे मिटरवर भाडं आकारलं जात नाही आणि त्यामुळं लोकांसाठी ही एक मोठी डोकेदुखी झाली आहे.ऑटोचालक मीटर असुनही मीटरनं भाडे आकारलं जात नसल्याची तक्रार प्रवाशांची आहे. नागपूरमध्ये वेगवेगळ्या भागासाठी ऑटोचे भाडे ही वेगवेगळे आहेत. मीटरप्रमाणे भाडे घेण्यास चालकांचा नकार असतो. ' मी 15 वर्षांपासून ऑटो चालवतो. मीटरने रिक्षात कोणीच बसत नाही. ठिकाणाप्रमाणे भाडं आकारलं जातं ', असं ऑटो चालक सुनील लोहवे यांनी सांगितलं.ऑटोला मीटर ची सक्ती करण्याच काम परिवहन विभागाच आहे. यासाठी कठोर नियम ही आहेत. पण खुद्द परिवहन विभागच इथे नांगी टाकताना दिसतंय.' एकतर प्रवाशांचा प्रतिसाद नाही. आम्ही मीटर बसवण्यासंदर्भांत प्रयत्नशील आहोत' , असं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागडी यांनी सांगितलं. नागपूरातील जवळपास 90 हजारांच्या वर तीन चाकी ऑटो आहेत. महानगरपालिकेनं या ऑटोंना शहरातील विविध भागात ऑटो स्टँन्डची जागा करुन दिली आहे. इतकं सगळं असुनही ग्राहकांचं गार्‍हाणं ऐकायला कोणीही तयार नाही, असंच दिसतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2008 11:34 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2008 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close