S M L

ऊस आंदोलन चिघळले ; पहिला हप्ता 2,350 रुपयेच हवा !

06 नोव्हेंबरशेतकरी संघटनांनी सुरु केलेलं उसाचं आंदोलन आता चांगलंच चिघळलं आहे. ऊसदरावरून शेतकरी आक्रमक होत बारामतीतल्या माळेगावजवळ ऊस वाहतूक करणार्‍या सहा गाड्यांचे टायर फोडले. माळेगावजवळच्या पंदेरे गावाजवळची ही घटना आहे. ऊस वाहतूक केली जाणार्‍या गाड्यांवर संघटनांचे कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. तर दुसरीकडे माळेगाव साखर लकारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली. ऊसाला पहिली उचल 2, 350 रु, मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन छेडलं आणि आता या आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केलं आहे. साखर कारखाने आणि सरकार नवीन दर द्यायला असमर्थ आहेत. शेतकरी नवीन दरासाठी हट्टाला पेटले आहे. तोडी बंद झाल्याने कारखान्यांच गाळप बंद पडलंय आणि आता तीनही शेतकरी संघटना एकत्र आल्याने आंदोलन अधिकचं उग्र झालं आहे.गाळपाचा सीझन सुरु झाला आणि कारखान्यांचे बॉयलर पेटतायत न पेटतायच तोच राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस आंदोलनाची हाक दिली. पहिली उचल 2,350 द्या नाहीतर उसाचं कांडंही तोडू देणार नाही असा पवित्रा संघटनेनं घेतला.त्यासाठी आधी बारामतीत मेळावा आणि नंतर जयसिंगपुरात ऊस परिषदही झाली. ऊस पिकवणारा शेतकरी आक्रमक होता आणि सरकारवर प्रचंड संतापलेलाही....ऊसतोड कामगारांची मंजुरी वाढली. पवार - मुंडे लवादाने त्यासाठी पुढाकार घेतला. मग देशभरात साखर पुरवण्र्‍या शेतकर्‍यांनाच का नागवलं जातंय असा संतप्त सवाल करत हा उत्पादक मग थेट रस्त्यावरच उतरला. आणि ठिकठिकाणी हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली.ऊस वाहतुकीच्या ट्रकची मोडतोड होत आहे. टायरगाड्या जाळल्या जात आहे. तोडीवर जाणार्‍यांना अडवलं जातंय. तिन्ही शेतकरी संघटनानंनी एकत्र येऊन आंदोलन अधिकचं तीव्र केलंय. त्यामुळे सांगलीतल्या कारखाना परिसरांसह संपूर्ण कोल्हापूर जिल्हा अशांत घोषित करण्यात आला. आधी शांत असलेल्या जुन्नर परिसरातही पुणे- नाशिक हाय वे रोखून शेतकर्‍यांनी आंदोलनाचा तडाखा दिला. दुसरीकडे तोडगा काढण्याऐवजी संचालक होऊन एवढा भाव देऊन दाखवा असली आव्हानं सत्ताधारी देत आहे.ऊसउत्पादकांचे आंदोलन राज्यभरात पसरतंय. सरकारला मात्र अजूनही जाग आलेली नाही. केंद्रातल्या आणि राज्याच्या कृषीमंत्र्यांना तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही. कारखाने बंद आहेत. तोडीवरचा कामगार आंदोलनामुळे धास्तावला आहे. आंदोलनाकडे सरकार असंच दुर्लक्ष करत राहिलं, तर त्याचे यापेक्षाही हिंसक पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सांगलीत कडकडीत बंदतिकडे सांगली जिल्ह्यात शेतकरी संघटनेचं उग्र आंदोलन सुरु आहे. ऊसाला पहिला हप्ता 2,350 रुपये मिळावा या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी आग्रही आहेत. वाळवा आणि पलूस तालुक्यातल्या 20 गावांमध्ये शेतकर्‍यांनी काल कडकडीत बंद पाळला. गावातील दुकानं आणि बाजारपेठा बंद ठेवून गावकर्‍यांनी सर्व व्यवहार बंद ठेवले. तसेच सरकार आणि साखर कारखानदारांच्या पुतळ्याचंही दहन केलंय. तिन्ही शेतकरी संघटना एकत्र आल्यामुळे शेतकर्‍यांचे आंदोलन चांगलच आक्रमक झालं आहे. पहिली उचल 2,350 रुपयेच हवी ! कृषीमंत्री शरद पवार यांच्या बारामती तालुक्यातल्या सोमेश्‍वर साखर कारखान्यात ऊसाला पहिली उचल 2,350 रुपये मिळावी या मागणीसाठी शेतकरी कृती समितीचं आंदोलन सुरू आहे. पण ऊस तोडणीअभावी सोमेश्वरचं गाळप दोन दिवसांपासून बंद पडलं आहे. ऊस तोडणी पुन्हा सुरू होण्यासाठी संचालक मंडळाने उपोषणाचा निर्णय घेतला. पण उपोषणाला पाठिंबा मिळण्याऐवजी संचालक मंडळाला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. संचालक मंडळाने 1,800 रूपये दर देण्याचा निर्णय घेतला. पण शेतकरी कृती समिती 2,350 रूपये भाव मिळावा या मागणीवर कायम आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यात सोमेश्वर हा साखर कारखाना येतो.पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको उत्तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधल्या विघ्नहर कारखाना परिसरातील शेतकरीही आक्रमक झाले आहेत. उसाचा पहिला हप्ता 2,350 रु. मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत, शेतकर्‍यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरला. शेतकर्‍यांनी कारखान्याच्या गट कार्यालयालाही टाळं ठोकलंय. पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनं सुरू असताना उत्तर पुणे जिल्हा आतापर्यंत शांत होता. मात्र आंदोलनाचे लोण इथंही पोहोचलं आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2011 04:19 PM IST

ऊस आंदोलन चिघळले ; पहिला हप्ता 2,350 रुपयेच हवा !

06 नोव्हेंबर

शेतकरी संघटनांनी सुरु केलेलं उसाचं आंदोलन आता चांगलंच चिघळलं आहे. ऊसदरावरून शेतकरी आक्रमक होत बारामतीतल्या माळेगावजवळ ऊस वाहतूक करणार्‍या सहा गाड्यांचे टायर फोडले. माळेगावजवळच्या पंदेरे गावाजवळची ही घटना आहे. ऊस वाहतूक केली जाणार्‍या गाड्यांवर संघटनांचे कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. तर दुसरीकडे माळेगाव साखर लकारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली.

ऊसाला पहिली उचल 2, 350 रु, मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन छेडलं आणि आता या आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केलं आहे. साखर कारखाने आणि सरकार नवीन दर द्यायला असमर्थ आहेत. शेतकरी नवीन दरासाठी हट्टाला पेटले आहे. तोडी बंद झाल्याने कारखान्यांच गाळप बंद पडलंय आणि आता तीनही शेतकरी संघटना एकत्र आल्याने आंदोलन अधिकचं उग्र झालं आहे.

गाळपाचा सीझन सुरु झाला आणि कारखान्यांचे बॉयलर पेटतायत न पेटतायच तोच राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस आंदोलनाची हाक दिली. पहिली उचल 2,350 द्या नाहीतर उसाचं कांडंही तोडू देणार नाही असा पवित्रा संघटनेनं घेतला.

त्यासाठी आधी बारामतीत मेळावा आणि नंतर जयसिंगपुरात ऊस परिषदही झाली. ऊस पिकवणारा शेतकरी आक्रमक होता आणि सरकारवर प्रचंड संतापलेलाही....ऊसतोड कामगारांची मंजुरी वाढली. पवार - मुंडे लवादाने त्यासाठी पुढाकार घेतला. मग देशभरात साखर पुरवण्र्‍या शेतकर्‍यांनाच का नागवलं जातंय असा संतप्त सवाल करत हा उत्पादक मग थेट रस्त्यावरच उतरला. आणि ठिकठिकाणी हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली.

ऊस वाहतुकीच्या ट्रकची मोडतोड होत आहे. टायरगाड्या जाळल्या जात आहे. तोडीवर जाणार्‍यांना अडवलं जातंय. तिन्ही शेतकरी संघटनानंनी एकत्र येऊन आंदोलन अधिकचं तीव्र केलंय. त्यामुळे सांगलीतल्या कारखाना परिसरांसह संपूर्ण कोल्हापूर जिल्हा अशांत घोषित करण्यात आला. आधी शांत असलेल्या जुन्नर परिसरातही पुणे- नाशिक हाय वे रोखून शेतकर्‍यांनी आंदोलनाचा तडाखा दिला. दुसरीकडे तोडगा काढण्याऐवजी संचालक होऊन एवढा भाव देऊन दाखवा असली आव्हानं सत्ताधारी देत आहे.

ऊसउत्पादकांचे आंदोलन राज्यभरात पसरतंय. सरकारला मात्र अजूनही जाग आलेली नाही. केंद्रातल्या आणि राज्याच्या कृषीमंत्र्यांना तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही. कारखाने बंद आहेत. तोडीवरचा कामगार आंदोलनामुळे धास्तावला आहे. आंदोलनाकडे सरकार असंच दुर्लक्ष करत राहिलं, तर त्याचे यापेक्षाही हिंसक पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

सांगलीत कडकडीत बंद

तिकडे सांगली जिल्ह्यात शेतकरी संघटनेचं उग्र आंदोलन सुरु आहे. ऊसाला पहिला हप्ता 2,350 रुपये मिळावा या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी आग्रही आहेत. वाळवा आणि पलूस तालुक्यातल्या 20 गावांमध्ये शेतकर्‍यांनी काल कडकडीत बंद पाळला. गावातील दुकानं आणि बाजारपेठा बंद ठेवून गावकर्‍यांनी सर्व व्यवहार बंद ठेवले. तसेच सरकार आणि साखर कारखानदारांच्या पुतळ्याचंही दहन केलंय. तिन्ही शेतकरी संघटना एकत्र आल्यामुळे शेतकर्‍यांचे आंदोलन चांगलच आक्रमक झालं आहे. पहिली उचल 2,350 रुपयेच हवी !

कृषीमंत्री शरद पवार यांच्या बारामती तालुक्यातल्या सोमेश्‍वर साखर कारखान्यात ऊसाला पहिली उचल 2,350 रुपये मिळावी या मागणीसाठी शेतकरी कृती समितीचं आंदोलन सुरू आहे. पण ऊस तोडणीअभावी सोमेश्वरचं गाळप दोन दिवसांपासून बंद पडलं आहे. ऊस तोडणी पुन्हा सुरू होण्यासाठी संचालक मंडळाने उपोषणाचा निर्णय घेतला.

पण उपोषणाला पाठिंबा मिळण्याऐवजी संचालक मंडळाला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. संचालक मंडळाने 1,800 रूपये दर देण्याचा निर्णय घेतला. पण शेतकरी कृती समिती 2,350 रूपये भाव मिळावा या मागणीवर कायम आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यात सोमेश्वर हा साखर कारखाना येतो.

पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको

उत्तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधल्या विघ्नहर कारखाना परिसरातील शेतकरीही आक्रमक झाले आहेत. उसाचा पहिला हप्ता 2,350 रु. मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत, शेतकर्‍यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरला. शेतकर्‍यांनी कारखान्याच्या गट कार्यालयालाही टाळं ठोकलंय. पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनं सुरू असताना उत्तर पुणे जिल्हा आतापर्यंत शांत होता. मात्र आंदोलनाचे लोण इथंही पोहोचलं आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2011 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close