S M L

कोकणात आघाडीच्या मंत्र्यांचा धुमाकूळ

07 नोव्हेंबरकोकणात राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणे विरुद्ध नगरविकास मंत्री भास्कर जाधव असा संघर्ष पेटला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या दोन मंत्र्यांच्या समर्थकांनी आज कोकणात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आज चिपळूणमध्ये भास्कर जाधवांच्या संपर्क कार्यालयाची राणे समर्थकांनी तोडफोड केली. तर लांजामध्ये भास्कर जाधव यांचा पुतळाही राणे समर्थकांनी जाळला. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरून चिपळूण पोलीस ठाण्यात खासदार निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला. निलेश राणे आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे संतोष तंादळे यांनीही तक्रार दाखल केली. गेल्याकाही दिवसांपासून कोकणात नारायण राणे आणि भास्कर जाधव यांच्या वाक्य युध्द रंगले आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण येथे सभा घेणाचा सपाटा लावला. यावेळी यावेळी राणे यांनी जाधव यांच्यावर टीका केली होती. यानंतर जाधव यांनी सभा घेऊन राणेंच्या टीकेला प्रतिउत्तर देत कोंबडी चोर असा टोला लगावला होता. आज भास्कर जाधव यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ला हा याचं वादातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे. तर दुसरीकडे राणेंना घरचा आहेर देत काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी राणेंच्या विरोधात जाहीर सभा घेऊन टाकली. दरम्यान राणे समर्थकांनी केलेल्या हल्याच्या निषेधार्थ भास्कर जाधव यांच्या समर्थकांनीही मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण इथं रास्ता रोको केला. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक 4 तासांपेक्षा जास्त काळ ठप्प झाली. एवढंच नाही तर भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कार्यालयावर हल्ला केला.दरम्यान आता सगळ्या प्रकरणावर भास्कर जाधव यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचे समर्थन नाही असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर ज्या भाषेत भास्कर जाधव आज बोलले त्याच भाषेत ते लोकांना धमकावतात असा आरोपही राणे यांनी केला. भास्कर जाधव यांच्या कुठल्या कृतीची दखल घेतली नव्हती, पण आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करेल असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. हल्ल्याच्या वेळी खासदार निलेश राणे तिथे हजर नव्हते ते असे करणार नाहीत असंही राणे म्हणाले. मात्र जाधव यांनी हा हल्ला निलेश राणे यांनीच केला असा दावा केला. काल रविवारीच कोकणात चाललेल्या धुमाकूळावरून राणे यांनी आपल्याच पक्षावर संशय घेतला. पक्षात माझ्या विरोधात एक मोठा नेता षडयंत्र रचत आहे असा आरोप केला. राणे यांच्या आरोपांने पक्षात एकच चर्चेला उधाण आलं. याप्रकरणी काँग्रेस प्रदेशअध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्टीकरण देत राणेंचा काही तरी गैरसमज होत आहे असं सांगत हात झटकले. मात्र दोन मोठ्या नेत्यांकडून कोकणात होत असेलेला धुमकूळामुळे नागरिकांच्या समस्येवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2011 05:12 PM IST

कोकणात आघाडीच्या मंत्र्यांचा धुमाकूळ

07 नोव्हेंबर

कोकणात राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणे विरुद्ध नगरविकास मंत्री भास्कर जाधव असा संघर्ष पेटला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या दोन मंत्र्यांच्या समर्थकांनी आज कोकणात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आज चिपळूणमध्ये भास्कर जाधवांच्या संपर्क कार्यालयाची राणे समर्थकांनी तोडफोड केली. तर लांजामध्ये भास्कर जाधव यांचा पुतळाही राणे समर्थकांनी जाळला. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरून चिपळूण पोलीस ठाण्यात खासदार निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला. निलेश राणे आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे संतोष तंादळे यांनीही तक्रार दाखल केली.

गेल्याकाही दिवसांपासून कोकणात नारायण राणे आणि भास्कर जाधव यांच्या वाक्य युध्द रंगले आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण येथे सभा घेणाचा सपाटा लावला. यावेळी यावेळी राणे यांनी जाधव यांच्यावर टीका केली होती. यानंतर जाधव यांनी सभा घेऊन राणेंच्या टीकेला प्रतिउत्तर देत कोंबडी चोर असा टोला लगावला होता. आज भास्कर जाधव यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ला हा याचं वादातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे.

तर दुसरीकडे राणेंना घरचा आहेर देत काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी राणेंच्या विरोधात जाहीर सभा घेऊन टाकली. दरम्यान राणे समर्थकांनी केलेल्या हल्याच्या निषेधार्थ भास्कर जाधव यांच्या समर्थकांनीही मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण इथं रास्ता रोको केला. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक 4 तासांपेक्षा जास्त काळ ठप्प झाली. एवढंच नाही तर भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कार्यालयावर हल्ला केला.

दरम्यान आता सगळ्या प्रकरणावर भास्कर जाधव यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचे समर्थन नाही असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर ज्या भाषेत भास्कर जाधव आज बोलले त्याच भाषेत ते लोकांना धमकावतात असा आरोपही राणे यांनी केला. भास्कर जाधव यांच्या कुठल्या कृतीची दखल घेतली नव्हती, पण आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करेल असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. हल्ल्याच्या वेळी खासदार निलेश राणे तिथे हजर नव्हते ते असे करणार नाहीत असंही राणे म्हणाले. मात्र जाधव यांनी हा हल्ला निलेश राणे यांनीच केला असा दावा केला.

काल रविवारीच कोकणात चाललेल्या धुमाकूळावरून राणे यांनी आपल्याच पक्षावर संशय घेतला. पक्षात माझ्या विरोधात एक मोठा नेता षडयंत्र रचत आहे असा आरोप केला. राणे यांच्या आरोपांने पक्षात एकच चर्चेला उधाण आलं. याप्रकरणी काँग्रेस प्रदेशअध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्टीकरण देत राणेंचा काही तरी गैरसमज होत आहे असं सांगत हात झटकले. मात्र दोन मोठ्या नेत्यांकडून कोकणात होत असेलेला धुमकूळामुळे नागरिकांच्या समस्येवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2011 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close