S M L

विबग्योर शाळेच्या मनमानी चपराक

08 नोव्हेंबरशाळेच्या मनमानी फीवाढीविरोधात पालकांनी आपल्या पाल्यासाठी दिलेला लढ्याला अखेर यश मिळाले. अविशा कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलीसाठी विबग्योर शाळेविरोधात लढा दिला आणि अखेर सुप्रीम कोर्टाने अविशा कुलकर्णी यांच्या बाजूने निकाल दिला. विबग्योर शाळेने फीमध्ये केलेल्या अवाजवी वाढीविरोधात अविशा लढा देत होत्या. त्यामुळे अधिश्रीला कोणतंही कारण न देता शाळा व्यवस्थापनाने शाळेतून काढून टाकलं होतं. त्याविरोधात अविशा यांनी मुंबई हायकोर्टात खटला दाखल केला होता. पण मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा आणि न्यायमूर्ती एस पी धर्माधिकारी यांनी विबग्योर शाळेच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर अविशाने अनुश्रीला चेंबूरच्या शाळेत प्रवेश घेऊन दिला. गेली दोन वर्ष अविशाने हे प्रकरण लावून धरलं. आता सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती हेमंत गोखले आणि न्या. लोढा यांनी अविशा आणि अधिश्रीला अखेर न्याय दिलाय. विबग्योर शाळेने अधिश्रीला शाळेतून काढून टाकण्याचे जारी केलेलं पत्र मागे घ्यावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. अधिश्रीचे यंदाचे 10 वीचं वर्ष असल्यामुळे तिला पुन्हा विबग्योर मध्ये प्रवेशासाठी न पाठवण्याचा निर्णय अविशा यांनी घेतला. एका शाळेविरोधात प्रवेशासाठी पालकांनी लढा दिलेली ही शिक्षण क्षेत्रातली ऐतिहासिक केस आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 8, 2011 03:24 PM IST

विबग्योर शाळेच्या मनमानी चपराक

08 नोव्हेंबर

शाळेच्या मनमानी फीवाढीविरोधात पालकांनी आपल्या पाल्यासाठी दिलेला लढ्याला अखेर यश मिळाले. अविशा कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलीसाठी विबग्योर शाळेविरोधात लढा दिला आणि अखेर सुप्रीम कोर्टाने अविशा कुलकर्णी यांच्या बाजूने निकाल दिला. विबग्योर शाळेने फीमध्ये केलेल्या अवाजवी वाढीविरोधात अविशा लढा देत होत्या. त्यामुळे अधिश्रीला कोणतंही कारण न देता शाळा व्यवस्थापनाने शाळेतून काढून टाकलं होतं. त्याविरोधात अविशा यांनी मुंबई हायकोर्टात खटला दाखल केला होता.

पण मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा आणि न्यायमूर्ती एस पी धर्माधिकारी यांनी विबग्योर शाळेच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर अविशाने अनुश्रीला चेंबूरच्या शाळेत प्रवेश घेऊन दिला. गेली दोन वर्ष अविशाने हे प्रकरण लावून धरलं. आता सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती हेमंत गोखले आणि न्या. लोढा यांनी अविशा आणि अधिश्रीला अखेर न्याय दिलाय. विबग्योर शाळेने अधिश्रीला शाळेतून काढून टाकण्याचे जारी केलेलं पत्र मागे घ्यावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. अधिश्रीचे यंदाचे 10 वीचं वर्ष असल्यामुळे तिला पुन्हा विबग्योर मध्ये प्रवेशासाठी न पाठवण्याचा निर्णय अविशा यांनी घेतला. एका शाळेविरोधात प्रवेशासाठी पालकांनी लढा दिलेली ही शिक्षण क्षेत्रातली ऐतिहासिक केस आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2011 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close