S M L

गोसीखुर्द धरणाच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट !

11 नोव्हेंबरपंचवीस वर्षं काम चाललेल्या गोसीखुर्द धरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची धक्कादायक माहिती पुढं आली. या धरणात पाणी अडवायला सुरूवात झाली, त्यावेळी या धरणाच्या निकृष्ठ बांधकामाचे पितळ उघड पडलं.गोसीखुर्दच्या डाव्या कालव्याच्या या कँनेलवर सध्या नव्यानचं केलेलं बांधकाम तोडण्यात येतं. याचं कारण म्हणजे, कॅनलची चाचणी सुरु असतानाच याला भेगा गेल्या. त्यानंतर हा 23 किलोमीटरचा कॅनल, तोडून पुन्हा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हे धरण पूर्ण व्हायला तब्बल 28 वर्षं लागले, आणि जेव्हा पाणी मिळण्याची वेळ आली तेव्हा हे बांधकाम निकृष्ट असल्याचं उघडं झालं. आणि आता पूर्ण धरणाच्या बांधकामचे संशयाच्या घेर्‍यात आलंय. आणि आता या बांधकामाच्या चौकशीची मागणी होत आहे. या निकृष्ट बांधकामाचा सर्वाधिक फटका बसलाय तो शेतकर्‍यांना. गेल्या 25 वर्षांपासून पाण्याची वाट बघणार्‍या शेतकर्‍यांना पाण्यासाठी आणखी किमान 2 वर्षं थांबावे लागणार आहे.राज्य सरकारने कंत्राटदाराला पुन्हा काम करण्याचे आदेश दिले आहेत. पण एवढ्या महत्वाच्या प्रकल्पाच्या बांधकामात ढिसाळपणा करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल का हाचं प्रश्न विचारण्यात येतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2011 09:54 AM IST

गोसीखुर्द धरणाच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट !

11 नोव्हेंबर

पंचवीस वर्षं काम चाललेल्या गोसीखुर्द धरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची धक्कादायक माहिती पुढं आली. या धरणात पाणी अडवायला सुरूवात झाली, त्यावेळी या धरणाच्या निकृष्ठ बांधकामाचे पितळ उघड पडलं.

गोसीखुर्दच्या डाव्या कालव्याच्या या कँनेलवर सध्या नव्यानचं केलेलं बांधकाम तोडण्यात येतं. याचं कारण म्हणजे, कॅनलची चाचणी सुरु असतानाच याला भेगा गेल्या. त्यानंतर हा 23 किलोमीटरचा कॅनल, तोडून पुन्हा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हे धरण पूर्ण व्हायला तब्बल 28 वर्षं लागले, आणि जेव्हा पाणी मिळण्याची वेळ आली तेव्हा हे बांधकाम निकृष्ट असल्याचं उघडं झालं. आणि आता पूर्ण धरणाच्या बांधकामचे संशयाच्या घेर्‍यात आलंय. आणि आता या बांधकामाच्या चौकशीची मागणी होत आहे. या निकृष्ट बांधकामाचा सर्वाधिक फटका बसलाय तो शेतकर्‍यांना. गेल्या 25 वर्षांपासून पाण्याची वाट बघणार्‍या शेतकर्‍यांना पाण्यासाठी आणखी किमान 2 वर्षं थांबावे लागणार आहे.

राज्य सरकारने कंत्राटदाराला पुन्हा काम करण्याचे आदेश दिले आहेत. पण एवढ्या महत्वाच्या प्रकल्पाच्या बांधकामात ढिसाळपणा करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल का हाचं प्रश्न विचारण्यात येतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2011 09:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close