S M L

डॉ.अब्दुल कलामांची अमेरिकेने मागितली माफी

13 नोव्हेंबरभारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची अमेरिकेतील न्युयॉर्क विमानतळावर झडती घेण्यातआल्याबद्दल अखेर अमेरिकेने माफी मागितली. न्युयॉर्क विमानतळावर कलाम यांची एकदा नाही तर दोन वेळा झडती घेण्यात आली होती. त्यांना त्यांचं जॅकेट आणि बूटही काढायला लावले होते. जगातील सर्व देश ज्या शिष्टाचाराचं पालन करतात त्या शिष्टाचाराचं अमेरिकेनं उल्लंघन केलं. अमेरिकेतील न्युयॉर्क विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी कलाम यांना थांबवून झडती घेतल्याने भारतीय दुतावासाने याचा तीव्र शब्दात निषेध केला. याआधीही असे अनेक प्रकार घडलेले आहेत. अब्दुल कलाम यांचं नाव ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या लिस्टमध्ये असूनही त्यांची झडती कशी घेण्यात आली हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला. यापूर्वीही वॉशिंग्टन विमानतळावरही हा प्रकार घडला होता. भारताने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. आणि त्यानंतर अमेरिकेला जाग आली आणि त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. अमेरिकेचा माफीनामाभारताचे माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्याबद्दल अमेरिकेला खूप आदर आहे. न्युयॉर्कमधल्या जॉन एफ केनेडी विमानतळावर 29 सप्टेंबरला झडतीच्यावेळी त्यांना जो त्रास झाला, त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. अतिविशेष व्यक्तींच्या झडतीचे नियम पाळण्यात आले नाही. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आम्ही तातडीनं प्रयत्न सुरू केले आहेत असं अमेरिकेनं म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2011 11:34 AM IST

डॉ.अब्दुल कलामांची अमेरिकेने मागितली माफी

13 नोव्हेंबर

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची अमेरिकेतील न्युयॉर्क विमानतळावर झडती घेण्यातआल्याबद्दल अखेर अमेरिकेने माफी मागितली. न्युयॉर्क विमानतळावर कलाम यांची एकदा नाही तर दोन वेळा झडती घेण्यात आली होती. त्यांना त्यांचं जॅकेट आणि बूटही काढायला लावले होते. जगातील सर्व देश ज्या शिष्टाचाराचं पालन करतात त्या शिष्टाचाराचं अमेरिकेनं उल्लंघन केलं. अमेरिकेतील न्युयॉर्क विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी कलाम यांना थांबवून झडती घेतल्याने भारतीय दुतावासाने याचा तीव्र शब्दात निषेध केला. याआधीही असे अनेक प्रकार घडलेले आहेत. अब्दुल कलाम यांचं नाव ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या लिस्टमध्ये असूनही त्यांची झडती कशी घेण्यात आली हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला. यापूर्वीही वॉशिंग्टन विमानतळावरही हा प्रकार घडला होता. भारताने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. आणि त्यानंतर अमेरिकेला जाग आली आणि त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली.

अमेरिकेचा माफीनामा

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्याबद्दल अमेरिकेला खूप आदर आहे. न्युयॉर्कमधल्या जॉन एफ केनेडी विमानतळावर 29 सप्टेंबरला झडतीच्यावेळी त्यांना जो त्रास झाला, त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. अतिविशेष व्यक्तींच्या झडतीचे नियम पाळण्यात आले नाही. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आम्ही तातडीनं प्रयत्न सुरू केले आहेत असं अमेरिकेनं म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2011 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close