S M L

राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे

14 नोव्हेंबरउत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीला आता जेमतेम सहा महिने राहिले आहे. काँग्रेसने मात्र उत्तर प्रदेशातल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. नेहरू-गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अलाहबादच्या फूलपूरमध्ये राहुल गांधींची सभा सुरू आहे. मात्र फुलपूरमध्ये राहुल गांधींना समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. या सभेला भरपूर गर्दी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा रीटा बहुगुणा आणि केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद हेही राहुल गांधींसोबत आहेत.फूलपूरमध्ये राहुल गांधींचं हेलिकॉप्टर उतरताच त्यांचा निषेध करण्यासाठी हे काळे झेंडे दाखवले गेले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2011 09:08 AM IST

राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे

14 नोव्हेंबर

उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीला आता जेमतेम सहा महिने राहिले आहे. काँग्रेसने मात्र उत्तर प्रदेशातल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. नेहरू-गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अलाहबादच्या फूलपूरमध्ये राहुल गांधींची सभा सुरू आहे. मात्र फुलपूरमध्ये राहुल गांधींना समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. या सभेला भरपूर गर्दी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा रीटा बहुगुणा आणि केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद हेही राहुल गांधींसोबत आहेत.फूलपूरमध्ये राहुल गांधींचं हेलिकॉप्टर उतरताच त्यांचा निषेध करण्यासाठी हे काळे झेंडे दाखवले गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2011 09:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close