S M L

भैय्यांनो, महाराष्ट्रात किती दिवस भीक मागणार ? - राहुल गांधी

14 नोव्हेंबरराहुल गांधींनी आज उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले. पण त्यांची फुलपूरमधली सभा चांगलीच वादात सापडली. युपीतल्या लोकांनी महाराष्ट्रात भीक मागायला जाऊ नये, या त्यांच्या विधानाचा विरोधकांनी समाचार घेतला. तर त्यांच्या सभेत केंद्रीय मंत्र्याने विरोधकांच्या कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी मारल्यामुळेही नव्या वादाला तोंड फुटलं आहे. देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्यात निवडणुकीचे रण ख-या अर्थानं पेटलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जन्मस्थळी.. म्हणजे फुलपूरमध्ये राहुल गांधींनी प्रचाराचा नारळ फोडला. पण या ठिकाणी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवणा-या लोकांना केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी स्वतःच लाथाबुक्क्यांनी प्रसाद दिला. हे समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते होते, म्हणून आम्ही केलं ते योग्यच होतं अशी सारवासारव काँग्रेसचे स्थानिक नेते प्रमोद तिवारी यांनी केली.उत्तर प्रदेशात येत्या फेब्रुवारी महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. काँग्रेस पक्षाचे या राज्यात पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी राहुल गांधींनी घेतलीय. त्यांच्या मुख्य टार्गेट आहेत मुख्यमंत्री मायावती. मायावतींनी केंद्राकडून मिळालेल्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप राहुलनी केला. मायावतींमुळेच उत्तर प्रदेशातल्या लोकांवर महाराष्ट्रात जाऊन भीक मागण्याची वेळ आली या त्यांच्या विधानामुळे नव्याच वादाला तोंड फुटलं. राहूल गांधींच्या या विधानाचा मायावतींनी समाचार घेतला. आम्ही महाराष्ट्रात भीक मागायला जात नाही, तर तिथे मेहनतीने काम करून पैसे कमावतो असं त्या म्हणाल्या. तर उत्तर प्रेदशातल्या लोकांना नेहरू गांधी घराण्यामुळेच भीक मागावी लागतीये असं राज ठाकरे म्हणाले. उत्तर प्रदेश आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी एकाच सुमारास निवडणुका होत आहे. आणि ही दोन्ही ठिकाणं एकमेकांपासून एक हजार मैलांवर असली, तरी भाषिक अस्मितेचा भावनिक मुद्दा मात्र दोन्हीकडे एकसमान आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2011 10:08 AM IST

भैय्यांनो, महाराष्ट्रात किती दिवस भीक मागणार ? - राहुल गांधी

14 नोव्हेंबर

राहुल गांधींनी आज उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले. पण त्यांची फुलपूरमधली सभा चांगलीच वादात सापडली. युपीतल्या लोकांनी महाराष्ट्रात भीक मागायला जाऊ नये, या त्यांच्या विधानाचा विरोधकांनी समाचार घेतला. तर त्यांच्या सभेत केंद्रीय मंत्र्याने विरोधकांच्या कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी मारल्यामुळेही नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्यात निवडणुकीचे रण ख-या अर्थानं पेटलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जन्मस्थळी.. म्हणजे फुलपूरमध्ये राहुल गांधींनी प्रचाराचा नारळ फोडला. पण या ठिकाणी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवणा-या लोकांना केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी स्वतःच लाथाबुक्क्यांनी प्रसाद दिला. हे समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते होते, म्हणून आम्ही केलं ते योग्यच होतं अशी सारवासारव काँग्रेसचे स्थानिक नेते प्रमोद तिवारी यांनी केली.

उत्तर प्रदेशात येत्या फेब्रुवारी महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. काँग्रेस पक्षाचे या राज्यात पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी राहुल गांधींनी घेतलीय. त्यांच्या मुख्य टार्गेट आहेत मुख्यमंत्री मायावती. मायावतींनी केंद्राकडून मिळालेल्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप राहुलनी केला. मायावतींमुळेच उत्तर प्रदेशातल्या लोकांवर महाराष्ट्रात जाऊन भीक मागण्याची वेळ आली या त्यांच्या विधानामुळे नव्याच वादाला तोंड फुटलं.

राहूल गांधींच्या या विधानाचा मायावतींनी समाचार घेतला. आम्ही महाराष्ट्रात भीक मागायला जात नाही, तर तिथे मेहनतीने काम करून पैसे कमावतो असं त्या म्हणाल्या. तर उत्तर प्रेदशातल्या लोकांना नेहरू गांधी घराण्यामुळेच भीक मागावी लागतीये असं राज ठाकरे म्हणाले.

उत्तर प्रदेश आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी एकाच सुमारास निवडणुका होत आहे. आणि ही दोन्ही ठिकाणं एकमेकांपासून एक हजार मैलांवर असली, तरी भाषिक अस्मितेचा भावनिक मुद्दा मात्र दोन्हीकडे एकसमान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2011 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close