S M L

'किंगफिशर'ला आर्थिक टेकू देऊ नका !

13 नोव्हेंबरदेशातील दुसरी आणि सर्वात मोठी असलेली हवाई वाहतूक कंपनी किंगफिशर एअरलाईन्सला बेल आऊट पॅकेज देण्याच्या हालचालींवरुन आता विरोधक आक्रमक झाले आहेत. डावे पक्ष आणि भाजप दोघांनीही बेल आऊट पॅकेजचा विरोध केला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सला बेल आऊट पॅकेज देण्याची घोषणा सरकारने केलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशाप्रकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. किंगफिशरला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही पंतप्रधानांनी दिलं होतं. पण बेल आऊट पॅकेज आणि भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी विरोध केला. दरम्यान सरकारने किंगफिशरला बेलआऊट देण्याचा निर्णय घेतलेला नाही आणि भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात परकीय गुंतवणूक हा काही एका दिवसात घेण्यासारखा निर्णय नाही, अशी सारवासारव हवाई वाहतूक मंत्री वायलर रवी यांनी केली. तर दुसरीकडे या किंगफिशर एअरलाईंसची काळजी आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही लागली आहे. याविषयी पंतप्रधान अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. किंगफिशरला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी आधीच सांगितलं होतं. आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आपला तीव्र विरोध दर्शवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2011 04:30 PM IST

'किंगफिशर'ला आर्थिक टेकू देऊ नका !

13 नोव्हेंबर

देशातील दुसरी आणि सर्वात मोठी असलेली हवाई वाहतूक कंपनी किंगफिशर एअरलाईन्सला बेल आऊट पॅकेज देण्याच्या हालचालींवरुन आता विरोधक आक्रमक झाले आहेत. डावे पक्ष आणि भाजप दोघांनीही बेल आऊट पॅकेजचा विरोध केला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सला बेल आऊट पॅकेज देण्याची घोषणा सरकारने केलेली नाही.

पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशाप्रकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. किंगफिशरला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही पंतप्रधानांनी दिलं होतं. पण बेल आऊट पॅकेज आणि भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी विरोध केला.

दरम्यान सरकारने किंगफिशरला बेलआऊट देण्याचा निर्णय घेतलेला नाही आणि भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात परकीय गुंतवणूक हा काही एका दिवसात घेण्यासारखा निर्णय नाही, अशी सारवासारव हवाई वाहतूक मंत्री वायलर रवी यांनी केली. तर दुसरीकडे या किंगफिशर एअरलाईंसची काळजी आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही लागली आहे. याविषयी पंतप्रधान अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. किंगफिशरला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी आधीच सांगितलं होतं. आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आपला तीव्र विरोध दर्शवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2011 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close