S M L

राहुल गांधींना समज कमी - राज ठाकरे

14 नोव्हेंबरराहुल गांधी यांना समज जरा कमीच असून, गांधी घराण्यामुळेच लोकांना भीक मागायची वेळ आली अशी खरमरीत टीका राज ठाकरे यांनी केली. राज यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर हल्लाबोल केला. एवढंच जर असेल, तर काँग्रेसने उत्तरप्रदेशचा विकास का केला नाही असा सवाल राज यांनी केला. गांधी कुटुंबाचा उत्तरप्रदेशात मतदारसंघ असतानाही विकास झाला नाही असंही राज यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर 'परप्रांतिय' हे महाराष्ट्राची डोकेदुखी असून महाराष्ट्रातल्या कणाहीन नेत्यांमुळेच हे घडत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांची आज उत्तरप्रदेशमध्ये निवडणुकांच बिंगुल फुकंत प्रचाराला सुरुवात केली. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या मतदार संघात आज राहुल गांधींची प्रचार सभा झाली. यावेळी राहुल गांधींनी थेट मायावती सरकारवर हल्ला चढवला. उत्तरप्रदेशमधे सगळीकडे भ्रष्टाचाराचे राज्य असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. पोटभरण्यासाठी किती दिवस तुम्ही महाराष्ट्रात जाऊन भीख मागणार आहात असा सवालही त्यांनी उत्तर प्रदेशच्या मतदारांना केला. राहुल गांधी यांच्या विधानाचा समाचार घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्ला चढवला. राहुल गांधी यांना समज जरा कमीच असून, गांधी घराण्यामुळेच लोकांना भीक मागायची वेळ आली अशी खरमरीत टीका राज ठाकरे यांनी केली. एकतर पिढ्यान पिढ्यापासून चालत आलेला काँग्रेस घराण्याचा हा मतदार संघ आहे यांनी युपीचा विकास केला नाही. त्यामुळे यांना राज्यबाहेर पडून दुसर्‍याराज्यात जाऊन त्यांची डोकेदुखी हे परप्रांतीय बनले आहे. आणि याला आपले कणाहीन नेते जबाबदारही आहे अशी टीका ही राज ठाकरे यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2011 02:43 PM IST

राहुल गांधींना समज कमी - राज ठाकरे

14 नोव्हेंबर

राहुल गांधी यांना समज जरा कमीच असून, गांधी घराण्यामुळेच लोकांना भीक मागायची वेळ आली अशी खरमरीत टीका राज ठाकरे यांनी केली.

राज यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर हल्लाबोल केला. एवढंच जर असेल, तर काँग्रेसने उत्तरप्रदेशचा विकास का केला नाही असा सवाल राज यांनी केला. गांधी कुटुंबाचा उत्तरप्रदेशात मतदारसंघ असतानाही विकास झाला नाही असंही राज यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर 'परप्रांतिय' हे महाराष्ट्राची डोकेदुखी असून महाराष्ट्रातल्या कणाहीन नेत्यांमुळेच हे घडत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांची आज उत्तरप्रदेशमध्ये निवडणुकांच बिंगुल फुकंत प्रचाराला सुरुवात केली. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या मतदार संघात आज राहुल गांधींची प्रचार सभा झाली. यावेळी राहुल गांधींनी थेट मायावती सरकारवर हल्ला चढवला. उत्तरप्रदेशमधे सगळीकडे भ्रष्टाचाराचे राज्य असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. पोटभरण्यासाठी किती दिवस तुम्ही महाराष्ट्रात जाऊन भीख मागणार आहात असा सवालही त्यांनी उत्तर प्रदेशच्या मतदारांना केला. राहुल गांधी यांच्या विधानाचा समाचार घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्ला चढवला. राहुल गांधी यांना समज जरा कमीच असून, गांधी घराण्यामुळेच लोकांना भीक मागायची वेळ आली अशी खरमरीत टीका राज ठाकरे यांनी केली. एकतर पिढ्यान पिढ्यापासून चालत आलेला काँग्रेस घराण्याचा हा मतदार संघ आहे यांनी युपीचा विकास केला नाही. त्यामुळे यांना राज्यबाहेर पडून दुसर्‍याराज्यात जाऊन त्यांची डोकेदुखी हे परप्रांतीय बनले आहे. आणि याला आपले कणाहीन नेते जबाबदारही आहे अशी टीका ही राज ठाकरे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2011 02:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close