S M L

कापूस आंदोलन पेटले

15 नोव्हेंबरऊस आंदोलनानंतर विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. कापसाला 6 हजार भाव देण्यात यावा या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन होतं आहे. आज विदर्भात वाशीम, नागपूर, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर येथे आंदोलन करण्यात आली. काही ठिकाणी बसेसची तोडफोड,टायर जाळपोळीच्या घटनाही घडल्यात. ऊस आंदोलनाची दखल घेत सरकारने कापसाचा प्रश्न पेटण्या अगोदरच पाऊलं उचलण्यासाठी सुरुवात केली आहे. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली आहे. मुंबईत गांधीभवन इथे चार वाजताही बैठक होत आहे. या बैठकीनंतर काँग्रेस आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटणार आहे. या भेटीत कापसाला हमीभाव वाढवून देण्याची मागणी करणारं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री आता याच प्रश्नावर दिल्लीत जाऊन उद्या पंतप्रधान मनमोहन सिंग आणि केद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेणार आहेत. रवि राणा यांचे तुरूंगात उपोषण सुरूतर दुसरीकडे अमरावती येथे काल सोमवारी आमदार रवि राणा यांच्यासह शंभर कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले होते. याप्रकरणी पोलिसांनी रवि राणा यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मात्र राणा यांनी तुरुंगातून उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. तर बुलठाण्यात आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पनन महासंघाच्या विभागीय कार्यालयाची शेतकर्‍यांनी तोडफोड केली आहे. तर चिखलीजवळ तीन एसटी बसेस फोडल्या आहेत.भाजपचा रास्ता रोकोकापसाला योग्य भाव मिळावा यासाठी भाजपच्या वतीने आज वर्धा जिल्ह्यातल्या धोत्रा चौरस्त्यावर रास्ता रोको करण्यात येतोय. याचं नेतृत्व चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर आणि मराठवाड्याचे आमदार पाशा पटेल करत आहे. यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. पणन च्या कार्यालयाची तोडफोडकापूस आणि सोयाबीनला जादा हमीभाव देण्यासाठी विदर्भात आता मनसेसुध्दा कापूस उत्पादक शेतक-यांबरोबर आंदोलन करत आहे. आज बुलडाण्यामध्ये, कापूस पणन महासंघाच्या विभागीय कार्यालयाची मनसे सैनिकांनी तोडफोड केली. टेबल, खुर्च्यांची नासधूस झाली. त्याआधी या आंदोलकांनी नागपूर-सोलापूर हायवेवर चिखलीजवळ रास्तारोको आंदोलनही केलं. शिवसेनेचा रास्ता रोकोशिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोराडी इथ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कापसासाठी सात हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी जाधव यांनी केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कोराडी-नागपूर रस्त्यावर ठिकठिकाणी टायर जाळले. हिवाळी अधिवेशनापुर्वी कापसाचा प्रश्न निकाली काढला नाही तर मंत्र्याच्या गाड्यांची जाळपोळ करण्याचा इशारा त्यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2011 10:34 AM IST

कापूस आंदोलन पेटले

15 नोव्हेंबर

ऊस आंदोलनानंतर विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. कापसाला 6 हजार भाव देण्यात यावा या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन होतं आहे. आज विदर्भात वाशीम, नागपूर, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर येथे आंदोलन करण्यात आली. काही ठिकाणी बसेसची तोडफोड,टायर जाळपोळीच्या घटनाही घडल्यात.

ऊस आंदोलनाची दखल घेत सरकारने कापसाचा प्रश्न पेटण्या अगोदरच पाऊलं उचलण्यासाठी सुरुवात केली आहे. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली आहे. मुंबईत गांधीभवन इथे चार वाजताही बैठक होत आहे. या बैठकीनंतर काँग्रेस आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटणार आहे. या भेटीत कापसाला हमीभाव वाढवून देण्याची मागणी करणारं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री आता याच प्रश्नावर दिल्लीत जाऊन उद्या पंतप्रधान मनमोहन सिंग आणि केद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेणार आहेत. रवि राणा यांचे तुरूंगात उपोषण सुरू

तर दुसरीकडे अमरावती येथे काल सोमवारी आमदार रवि राणा यांच्यासह शंभर कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले होते. याप्रकरणी पोलिसांनी रवि राणा यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मात्र राणा यांनी तुरुंगातून उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. तर बुलठाण्यात आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पनन महासंघाच्या विभागीय कार्यालयाची शेतकर्‍यांनी तोडफोड केली आहे. तर चिखलीजवळ तीन एसटी बसेस फोडल्या आहेत.

भाजपचा रास्ता रोको

कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी भाजपच्या वतीने आज वर्धा जिल्ह्यातल्या धोत्रा चौरस्त्यावर रास्ता रोको करण्यात येतोय. याचं नेतृत्व चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर आणि मराठवाड्याचे आमदार पाशा पटेल करत आहे. यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

पणन च्या कार्यालयाची तोडफोड

कापूस आणि सोयाबीनला जादा हमीभाव देण्यासाठी विदर्भात आता मनसेसुध्दा कापूस उत्पादक शेतक-यांबरोबर आंदोलन करत आहे. आज बुलडाण्यामध्ये, कापूस पणन महासंघाच्या विभागीय कार्यालयाची मनसे सैनिकांनी तोडफोड केली. टेबल, खुर्च्यांची नासधूस झाली. त्याआधी या आंदोलकांनी नागपूर-सोलापूर हायवेवर चिखलीजवळ रास्तारोको आंदोलनही केलं.

शिवसेनेचा रास्ता रोको

शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोराडी इथ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कापसासाठी सात हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी जाधव यांनी केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कोराडी-नागपूर रस्त्यावर ठिकठिकाणी टायर जाळले. हिवाळी अधिवेशनापुर्वी कापसाचा प्रश्न निकाली काढला नाही तर मंत्र्याच्या गाड्यांची जाळपोळ करण्याचा इशारा त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2011 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close