S M L

राज्य हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त बिल नाही - पाटील

16 नोव्हेंबरआगामी हिवाळी अधिवेशनामध्ये एकूण 20 विधेयकं मांडली जाणार आहेत. त्यापैकी 13 विधेयकं नव्याने मांडली जाणार आहेत. या 13 विधेयकामध्ये लोकायुक्त विधेयकाचा समावेश नाही तसेच हिवाळी अधिवेशनापर्यंत कुठलाही अध्यादेश काढला जाणार नाही अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे अण्णा हजारे यांनी मागणी केलेलं सक्षम लोकायुक्ताचे विधेयक हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकार मांडणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. आज विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली त्यामध्ये नव्या विधेयकाच्या मसुद्यांवर चर्चा झाली. त्याहीवेळी चर्चेत कुठेही लोकायुक्त विधेयकाचा उल्लेख झाला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2011 01:46 PM IST

राज्य हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त बिल नाही - पाटील

16 नोव्हेंबर

आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये एकूण 20 विधेयकं मांडली जाणार आहेत. त्यापैकी 13 विधेयकं नव्याने मांडली जाणार आहेत. या 13 विधेयकामध्ये लोकायुक्त विधेयकाचा समावेश नाही तसेच हिवाळी अधिवेशनापर्यंत कुठलाही अध्यादेश काढला जाणार नाही अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे अण्णा हजारे यांनी मागणी केलेलं सक्षम लोकायुक्ताचे विधेयक हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकार मांडणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. आज विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली त्यामध्ये नव्या विधेयकाच्या मसुद्यांवर चर्चा झाली. त्याहीवेळी चर्चेत कुठेही लोकायुक्त विधेयकाचा उल्लेख झाला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2011 01:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close