S M L

शेतकर्‍यांच्या जमिनी लाटणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

रायचंद शिंदे, जुन्नर17 नोव्हेंबरशेतकर्‍यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेत जमिनी हडप करणार्‍या रॅकेटचा शेतकर्‍यांनीच पर्दाफाश केला. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात हा प्रकार घडला आहे. पण यातल्या मुख्य आरोपीला अटक करण्यात मात्र खेड पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही. गेल्या तीन वर्षांपासून ही टोळी या परिसरात काम करत होती. दुय्यम निबंधक म्हणजेच रजिस्ट्रार कार्यालयातील अधिकार्‍यांच्या मदतीने बोगस व्यक्ती उभ्या करुन शेकडो शेतकर्‍यांच्या जमिनी लाटण्यात आल्याचं उघड झालं आहे. बोगस व्यक्ती उभ्या करुन जमिनी खरेदी-विक्रीच्या व्यवहारामुळे खेड तालुक्यातील रजिस्ट्रार कार्यालय मागच्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आलं आहे. 2007 सालामध्ये वशिरे गावातील 80 वर्षांच्या शंकर चिमा कुडेकर या वृद्धची फसवणूक करुन त्यांची 18 एकर जमीन अशाच प्रकारे लाटण्यातआल्याचं उघड झालं आहे. दाजी कुडेकर यांचीही अशीच फसवणूक करण्यात आली. या बाबतची तक्रार महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यंाच्याकडेही करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले, पण पुणे ग्रामीण पोलिसांनी मात्र यावर काहीही कारवाई केली नाही. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याचे या प्रकरणात लागेबांधे असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे. दाजी कुडेकर म्हणतात, माझ्या नावाखाली नवनाथ भिकाजी गोपाळे याला उभं केलं.- पोपट मारुती घनवट (मुख्य सूत्रधार आणि मालक- शिवम् बिल्डर्स)- तुकाराम शांताराम रौंदळ- नवनाथ भिकाजी गोपाळे- अनंत रामचंद्र चव्हाणया टोळीचे मुख्य सूत्रधार आहेत. तर त्यांच्याशिवाय इतर 11 जणही या टोळी सामील आहेत. खेड आणि चाकण पोलीस चौकीत यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, पण अजूनही पोलीस त्यांना अटक करु शकलेले नाहीत. आतातरी पोलीस गुन्हेगारांची साथ सोडून गरीब आणि फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळवून देतील अशी आशा शेतकर्‍यांना आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2011 11:46 AM IST

शेतकर्‍यांच्या जमिनी लाटणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

रायचंद शिंदे, जुन्नर

17 नोव्हेंबर

शेतकर्‍यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेत जमिनी हडप करणार्‍या रॅकेटचा शेतकर्‍यांनीच पर्दाफाश केला. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात हा प्रकार घडला आहे. पण यातल्या मुख्य आरोपीला अटक करण्यात मात्र खेड पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही. गेल्या तीन वर्षांपासून ही टोळी या परिसरात काम करत होती. दुय्यम निबंधक म्हणजेच रजिस्ट्रार कार्यालयातील अधिकार्‍यांच्या मदतीने बोगस व्यक्ती उभ्या करुन शेकडो शेतकर्‍यांच्या जमिनी लाटण्यात आल्याचं उघड झालं आहे.

बोगस व्यक्ती उभ्या करुन जमिनी खरेदी-विक्रीच्या व्यवहारामुळे खेड तालुक्यातील रजिस्ट्रार कार्यालय मागच्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आलं आहे. 2007 सालामध्ये वशिरे गावातील 80 वर्षांच्या शंकर चिमा कुडेकर या वृद्धची फसवणूक करुन त्यांची 18 एकर जमीन अशाच प्रकारे लाटण्यातआल्याचं उघड झालं आहे.

दाजी कुडेकर यांचीही अशीच फसवणूक करण्यात आली. या बाबतची तक्रार महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यंाच्याकडेही करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले, पण पुणे ग्रामीण पोलिसांनी मात्र यावर काहीही कारवाई केली नाही. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याचे या प्रकरणात लागेबांधे असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे.

दाजी कुडेकर म्हणतात, माझ्या नावाखाली नवनाथ भिकाजी गोपाळे याला उभं केलं.

- पोपट मारुती घनवट (मुख्य सूत्रधार आणि मालक- शिवम् बिल्डर्स)- तुकाराम शांताराम रौंदळ- नवनाथ भिकाजी गोपाळे- अनंत रामचंद्र चव्हाण

या टोळीचे मुख्य सूत्रधार आहेत. तर त्यांच्याशिवाय इतर 11 जणही या टोळी सामील आहेत. खेड आणि चाकण पोलीस चौकीत यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, पण अजूनही पोलीस त्यांना अटक करु शकलेले नाहीत. आतातरी पोलीस गुन्हेगारांची साथ सोडून गरीब आणि फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळवून देतील अशी आशा शेतकर्‍यांना आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2011 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close