S M L

फेडररला मोडायचा आहे सॅम्प्रासचा विक्रम

18 नोव्हेंबरमुग्धा कर्णिकगेली तब्बल चार वर्ष टेनिस जगतावर आपलं अधिराज्य गाजवणा-या रॉजर फेडररसाठी 2008चा सीझन फारसा चांगला गेला नाही. फेडररसाठी आत्तापर्यंतच्या करिअरची ही सर्वात खराब कामगिरी ठरली आहे. शांघाय मास्टर्स स्पर्धेत गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का बसला आणि गेल्या सात वर्षात जे घडलं नाही ते फेडररच्या पदरी पडलं. सात वर्षांत पहिल्यांदाच फेडरर या स्पर्धेची सेमीफायनलही गाठू शकला नाही. तसंच अँडी मरेनं यावर्षी चक्क तीनवेळा फेडररला हरवण्याची किमया केली.फेडररसाठी हे वर्ष खरच खूप चढउताराचं ठरलयं.वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये नोव्हॅक यॉकोविचकडून त्याला पराभवाचा धक्का बसला आणि त्यानंतर त्याचं पराभवाचं सत्र सुरू झालं.काही दिवसांनंतर राफेल नदालनं फेडररला फ्रेंच ओपनमध्ये पराभूत केलं आणि त्यानंतर पाच वर्षांत पहिल्यांदाच फेडररला विम्बल्डन स्पर्धेत ग्रास कोर्टवर नदालकडून पराभवाचा आणखी एक धक्का बसला. इतकंच नाही तर फेडररला मागे टाकत नदाल नवा टेनिस जगतातला नंबर वन प्लेअर बनला.या वर्षीच्या परफॉर्ममन्स बद्दल फेडरर सांगतो, हो हे वर्ष माझ्यासाठी खूप खडतर होतं. पण तरीही एक चांगला सीझन होता. मी सलग पाचव्यांदा यू एस् ओपन चॅम्पियन झालो .ती एक ग्रेट मॅच होती. हे वर्ष माझ्यासाठी खूप स्पेशल ठरलयं कारण मी बेसल, माझ्या देशात जिंकलो आणि त्यानंतर दुहेरीत ऑलम्पिकमधलं गोल्ड पटकावलं. यावर्षी माझ्या करिअरमध्ये अनेक चढउतार आले हे मात्र खरंय.वर्षाच्या शेवटच्या ग्रँड स्लॅममध्ये फेडररनं अँडी मरेला नमवत सलग पाच वेळा यू एस ओपन जिंकण्याचा पराक्रम केला.आणि करिअरमधील तब्बल 13 वी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली. 2009 च्या सिझनमध्ये फेडररचं सध्यातरी एकचं लक्ष असेल, दोन ग्रँड स्लॅम जिंकत पीट सॅम्प्रासचा सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदाचा विक्रम मोडीत काढण्याचं. पण फेडररचा सध्याचा फॉर्म बघता तो हा विक्रम करू शकेल की नाही हाच प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 18, 2008 06:18 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2008 06:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close