S M L

अखेर ठाण्यात 'आघाडी' निश्चित !

19 नोव्हेंबरआगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या आघाडीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात होणारच असं काँग्रेस-राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. राज्यभरातल्या पालिका आणि जिल्हा परिषदांच्या आघाडीबाबत येत्या बुधवारी चर्चा होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्यात आज संध्याकाळी सह्याद्रीवर चर्चा झाली. त्यात मुंबई आणि ठाण्यातल्या आघाडीबाबत निर्णय झाला. पण या बैठकीकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठ फिरवली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याऐवजी सह्याद्री बंगल्यावर ही चर्चा पार पडली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2011 05:14 PM IST

अखेर ठाण्यात 'आघाडी' निश्चित !

19 नोव्हेंबर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या आघाडीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात होणारच असं काँग्रेस-राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. राज्यभरातल्या पालिका आणि जिल्हा परिषदांच्या आघाडीबाबत येत्या बुधवारी चर्चा होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्यात आज संध्याकाळी सह्याद्रीवर चर्चा झाली. त्यात मुंबई आणि ठाण्यातल्या आघाडीबाबत निर्णय झाला. पण या बैठकीकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठ फिरवली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याऐवजी सह्याद्री बंगल्यावर ही चर्चा पार पडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2011 05:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close