S M L

पुढार्‍यांच्या प्रतिष्ठेसाठी बैलांचा छळ सुरूच - कटारिया

20 नोव्हेंबरमहाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारने बैलगाडा शर्यतींवर घातलेली बंदी कायम असल्याचा दावा अहमदनगरचे प्राणीमित्र आणि ऍनिमल वेल्फेअर ऑफिसर अनिल कटारिया यांनी केला. पण हा आदेश धुडकावत राजकीय पुढारी आपल्या प्रतिष्ठेपायी बैलांचा छळ करत असल्याचा आरोप कटारिया यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाने 24 ऑगस्ट 2011ला जीआर काढून बैलांच्या शर्यतीवर बंदी घातली. पण 'बूल' शब्दाचा अर्थ हिंदीमधे सांड असा दिल्याने सरकारने पुन्हा 12 सप्टंेबर 2011 ला जी आर काढला. पण या जी आरमध्ये बैल शब्द वगळून सांड किंवा वळू इत्यादींवर बंदी घातली. प्राणीमित्र कटारिया यांनी चेन्नईच्या भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाचा हवाला देत तसेच वन आणि पर्यावरण खात्याकडून मिळालेल्या माहीतीचा दाखला देत राज्यात बैलांच्या शर्यतीवर बंदी असल्याचा दावा केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2011 02:09 PM IST

पुढार्‍यांच्या प्रतिष्ठेसाठी बैलांचा छळ सुरूच - कटारिया

20 नोव्हेंबर

महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारने बैलगाडा शर्यतींवर घातलेली बंदी कायम असल्याचा दावा अहमदनगरचे प्राणीमित्र आणि ऍनिमल वेल्फेअर ऑफिसर अनिल कटारिया यांनी केला. पण हा आदेश धुडकावत राजकीय पुढारी आपल्या प्रतिष्ठेपायी बैलांचा छळ करत असल्याचा आरोप कटारिया यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाने 24 ऑगस्ट 2011ला जीआर काढून बैलांच्या शर्यतीवर बंदी घातली. पण 'बूल' शब्दाचा अर्थ हिंदीमधे सांड असा दिल्याने सरकारने पुन्हा 12 सप्टंेबर 2011 ला जी आर काढला. पण या जी आरमध्ये बैल शब्द वगळून सांड किंवा वळू इत्यादींवर बंदी घातली. प्राणीमित्र कटारिया यांनी चेन्नईच्या भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाचा हवाला देत तसेच वन आणि पर्यावरण खात्याकडून मिळालेल्या माहीतीचा दाखला देत राज्यात बैलांच्या शर्यतीवर बंदी असल्याचा दावा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2011 02:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close