S M L

युपीच्या विभाजनाला मंजुरी

21 नोव्हेंबरउत्तर प्रदेशात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. मुख्यमंत्री मायावती यांनी राज्याचे 4 भाग करणारा प्रस्ताव आज मंजूर करवून घेतला. त्यामुळे त्यांना विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत प्रचारात आघाडी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, नव्या राज्यांच्या निर्मितीचा बॉल आता मायावतींनी केंद्राच्या कोर्टात टाकून काँग्रेसला अडचणीत टाकलंय. उत्तर प्रदेशाचे चार राज्यात विभाजन करणारा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करुन घ्यायला मुख्यमंत्री मायावती यांना फक्त दहा मिनिटं लागील.आजच्या संपूर्ण कामकाजावर मायावतींची छाप दिसली. विधानसभा कामकाजाच्या यादीत राज्याच्या विभाजनाचा प्रस्ताव नव्हता. पण व्होट ऑन अकाऊंट मंजूर होताच मायावतींनी सभागृहात प्रवेश केला आणि मंत्रिमंडळात मंजूर झालेला राज्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला.11 वाजता सभागृहाचे कामकाज सुरु झालं. पण कामकाज सुरु होताच मायावतींच्या विरोधात पोस्टर फडकवत विरोधकांनी एकच गदारोळ सुरु केला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज तासाभरासाठी तहकूब करण्यात आलं. जवळपास 12 वाजून 20 मिनिटांनी सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरु झालं. मुख्यमंत्री मायावती सभागृहात आल्या. त्यांनी विभाजनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. आवाजी मतदानानं तो मंजूर करुन घेतला आणि त्यानंतर सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. समाजवादी पार्टी, भाजप आणि मायावतींविरोधात बंडखोरी करणारे बहुजन समाज पक्षाच्या काही आमदारांनी मिळून मायावतींविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. पण मायावतींना कशाचीच पर्वा दिसली नाही. बहुमत सिद्ध करण्याची विरोधकांची मागणीही त्यांनी धुडकावून लावली.बॉल केंद्राच्या पाल्यात टाकून मायावतींनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. काँग्रेस राज्याच्या विभाजनाला तडकाफडकी मंजूरी देऊन शकत नाही. त्यामुळे साहजिकच जनतेत काँग्रेसबद्दल नाराजी पसरेल. तर राज्याच्या विभाजनाचं दिलेलं आश्वासन पाळल्याचं सांगत मायवती विधानसभा निवडणुकीला सामोरं जातील.विभाजन : फायदा - तोटा मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला या विभाजनाचा सर्वात जास्त फायदा होईल. मायवतींची व्होट बँक असलेला दलित समाज संपूर्ण उत्तर प्रदेशात सारख्या प्रमाणात आहे. - उत्तर प्रदेशातला दुसरा महत्त्वाचा पक्ष समाजवादी पक्षाला या विभाजनाचा सर्वात जास्त तोटा होईल. कारण समाजवादी पक्षाची व्होट बँक असलेला यादव समाज हा विखुरलेला आहे. राज्यातल्या पूर्व भागात काही प्रमाणात यादव समाज आहे तर इटावा, मैनपुरी आणि इटाह बेल्टमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात हा समाज आहे.- राष्ट्रीय लोकदलाचे अजित सिंग यांचा हरित प्रदेशाला पाठिंबा आहे. राज्याच्या पश्चिम भागात जाट समाजाचं प्राबल्य आहे. त्यामुळे हरित प्रदेश अजित सिंग यांच्या फायद्याचा आहे. - बसपाप्रमाणे काँग्रेसची व्होट बँकसुद्धा राज्यात सर्वत्र आहे. पण त्यांचा प्रभाव अतिशय कमी आहे. - तर भाजपाचा प्रभाव पूर्व उत्तर प्रदेशात जास्त आहे. या भागात राजपूत आणि ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पूर्वांचलची निर्मिती भाजपसाठी फायद्याची आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2011 09:34 AM IST

युपीच्या विभाजनाला मंजुरी

21 नोव्हेंबर

उत्तर प्रदेशात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. मुख्यमंत्री मायावती यांनी राज्याचे 4 भाग करणारा प्रस्ताव आज मंजूर करवून घेतला. त्यामुळे त्यांना विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत प्रचारात आघाडी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, नव्या राज्यांच्या निर्मितीचा बॉल आता मायावतींनी केंद्राच्या कोर्टात टाकून काँग्रेसला अडचणीत टाकलंय.

उत्तर प्रदेशाचे चार राज्यात विभाजन करणारा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करुन घ्यायला मुख्यमंत्री मायावती यांना फक्त दहा मिनिटं लागील.आजच्या संपूर्ण कामकाजावर मायावतींची छाप दिसली. विधानसभा कामकाजाच्या यादीत राज्याच्या विभाजनाचा प्रस्ताव नव्हता. पण व्होट ऑन अकाऊंट मंजूर होताच मायावतींनी सभागृहात प्रवेश केला आणि मंत्रिमंडळात मंजूर झालेला राज्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला.

11 वाजता सभागृहाचे कामकाज सुरु झालं. पण कामकाज सुरु होताच मायावतींच्या विरोधात पोस्टर फडकवत विरोधकांनी एकच गदारोळ सुरु केला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज तासाभरासाठी तहकूब करण्यात आलं. जवळपास 12 वाजून 20 मिनिटांनी सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरु झालं. मुख्यमंत्री मायावती सभागृहात आल्या. त्यांनी विभाजनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. आवाजी मतदानानं तो मंजूर करुन घेतला आणि त्यानंतर सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं.

समाजवादी पार्टी, भाजप आणि मायावतींविरोधात बंडखोरी करणारे बहुजन समाज पक्षाच्या काही आमदारांनी मिळून मायावतींविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. पण मायावतींना कशाचीच पर्वा दिसली नाही. बहुमत सिद्ध करण्याची विरोधकांची मागणीही त्यांनी धुडकावून लावली.

बॉल केंद्राच्या पाल्यात टाकून मायावतींनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. काँग्रेस राज्याच्या विभाजनाला तडकाफडकी मंजूरी देऊन शकत नाही. त्यामुळे साहजिकच जनतेत काँग्रेसबद्दल नाराजी पसरेल. तर राज्याच्या विभाजनाचं दिलेलं आश्वासन पाळल्याचं सांगत मायवती विधानसभा निवडणुकीला सामोरं जातील.

विभाजन : फायदा - तोटा

मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला या विभाजनाचा सर्वात जास्त फायदा होईल. मायवतींची व्होट बँक असलेला दलित समाज संपूर्ण उत्तर प्रदेशात सारख्या प्रमाणात आहे.

- उत्तर प्रदेशातला दुसरा महत्त्वाचा पक्ष समाजवादी पक्षाला या विभाजनाचा सर्वात जास्त तोटा होईल. कारण समाजवादी पक्षाची व्होट बँक असलेला यादव समाज हा विखुरलेला आहे. राज्यातल्या पूर्व भागात काही प्रमाणात यादव समाज आहे तर इटावा, मैनपुरी आणि इटाह बेल्टमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात हा समाज आहे.

- राष्ट्रीय लोकदलाचे अजित सिंग यांचा हरित प्रदेशाला पाठिंबा आहे. राज्याच्या पश्चिम भागात जाट समाजाचं प्राबल्य आहे. त्यामुळे हरित प्रदेश अजित सिंग यांच्या फायद्याचा आहे.

- बसपाप्रमाणे काँग्रेसची व्होट बँकसुद्धा राज्यात सर्वत्र आहे. पण त्यांचा प्रभाव अतिशय कमी आहे.

- तर भाजपाचा प्रभाव पूर्व उत्तर प्रदेशात जास्त आहे. या भागात राजपूत आणि ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पूर्वांचलची निर्मिती भाजपसाठी फायद्याची आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2011 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close