S M L

सरकारकडे भ्रष्टाचार संपवण्यासाठी इच्छाशक्तीच नाही - अडवाणी

20 नोव्हेंबरया सरकारकडे भ्रष्टाचार संपवण्यासाठीची इच्छाशक्तीच नाही असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला. त्यांच्या जनचेतना यात्रेचा आज दिल्लीत रामलीला मैदानावर समारोप झाला. सरकारने विदेशातल्या काळ्या पैशावर काय ठोस पावलं उचलली जातायेत याबद्दल ठोस निवेदन किंवा माहिती सरकारने दिलीच पाहिजे अशी मागणी अडवाणींनी केली. आमची कोणत्याच विदेशी बँकांमध्ये खाती नाहीत. याचा पुरावा म्हणून हिवाळी अधिवेशनात येत्या आठवड्याभरात एनडीच्या सगळया घटकपक्षांचे खासदार आपलं लेखी निवेदन लोकसभा अध्यक्षांकडे सादर करतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, सुषमा स्वराज, अरूण जेटली यांच्यासह शिवसेनेचे अनंत गीतेआणि रिपाईचे नेते रामदास आठवलेही उपस्थित होते. यावेळी रामदास आठवले यांनी पंतप्रधानपदासाठी अडवाणींना पाठिंबा दिला. शिवाय एनडीएचं सरकार आलं तर आपल्याला दोन-तीन मंत्रीपदं देण्यात यावी अशी अपेक्षाही व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2011 11:00 AM IST

सरकारकडे भ्रष्टाचार संपवण्यासाठी इच्छाशक्तीच नाही - अडवाणी

20 नोव्हेंबर

या सरकारकडे भ्रष्टाचार संपवण्यासाठीची इच्छाशक्तीच नाही असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला. त्यांच्या जनचेतना यात्रेचा आज दिल्लीत रामलीला मैदानावर समारोप झाला. सरकारने विदेशातल्या काळ्या पैशावर काय ठोस पावलं उचलली जातायेत याबद्दल ठोस निवेदन किंवा माहिती सरकारने दिलीच पाहिजे अशी मागणी अडवाणींनी केली. आमची कोणत्याच विदेशी बँकांमध्ये खाती नाहीत. याचा पुरावा म्हणून हिवाळी अधिवेशनात येत्या आठवड्याभरात एनडीच्या सगळया घटकपक्षांचे खासदार आपलं लेखी निवेदन लोकसभा अध्यक्षांकडे सादर करतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, सुषमा स्वराज, अरूण जेटली यांच्यासह शिवसेनेचे अनंत गीतेआणि रिपाईचे नेते रामदास आठवलेही उपस्थित होते. यावेळी रामदास आठवले यांनी पंतप्रधानपदासाठी अडवाणींना पाठिंबा दिला. शिवाय एनडीएचं सरकार आलं तर आपल्याला दोन-तीन मंत्रीपदं देण्यात यावी अशी अपेक्षाही व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2011 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close