S M L

मुंबईसह ठाण्यात आघाडी, पुण्यात बिघाडी ?

20 नोव्हेंबरमुंबई आणि ठाणे महापालिका निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार हे स्पष्ट झालं आहे. मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. हे दोन्ही पक्ष महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पुणे काँग्रेसचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी हे सध्या तिहार मुक्कामी असल्याने शहर काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला वाढवण्यासाठी अजित पवार आता पूर्ण जोर लावणार आहेत. त्यासाठीच पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवू शकतो असा सूर निघत होता. त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या आघाडीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या चर्चेला सुरुवात झाली. मुंबई आणि ठाण्यात आघाडी होणारच असं काँग्रेस-राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं आहे. राज्यभरातल्या पालिका आणि जिल्हा परिषदांच्या आघाडीबाबत येत्या बुधवारी चर्चा होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्यात काल संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाली. त्यात मुंबई आणि ठाण्यातल्या आघाडीबाबत निर्णय झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2011 10:11 AM IST

मुंबईसह ठाण्यात आघाडी, पुण्यात बिघाडी ?

20 नोव्हेंबर

मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार हे स्पष्ट झालं आहे. मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. हे दोन्ही पक्ष महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पुणे काँग्रेसचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी हे सध्या तिहार मुक्कामी असल्याने शहर काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला वाढवण्यासाठी अजित पवार आता पूर्ण जोर लावणार आहेत.

त्यासाठीच पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवू शकतो असा सूर निघत होता. त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या आघाडीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या चर्चेला सुरुवात झाली. मुंबई आणि ठाण्यात आघाडी होणारच असं काँग्रेस-राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं आहे.

राज्यभरातल्या पालिका आणि जिल्हा परिषदांच्या आघाडीबाबत येत्या बुधवारी चर्चा होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्यात काल संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाली. त्यात मुंबई आणि ठाण्यातल्या आघाडीबाबत निर्णय झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2011 10:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close