S M L

इशरत जहाँ एन्काऊंटर बनावट : एसआयटी

21 नोव्हेंबरगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना धक्का देणारा निकाल आज गुजरात हायकोर्टाने दिला. 2004 साली अहमदाबादजवळ एक एन्काऊंटर झालं होतं. त्यात मुंब्रामध्ये राहणारी इशरत जहाँ नावाची तरुणी आणि तिच्या सोबत असलेले तिघं ठार झाले. पण हे एन्काऊंटर बनावट होतं, खोटं होतं, असा अहवाल स्पेशल इन्वेस्टिगेशन टीमने दिला. त्यामुळे गुजरात हायकोर्टाने 14 दोषी पोलिसांविरोधात खुनाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या बनावट एन्काऊंटर प्रकरणी SIT च्या अहवालात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 15 जून 2004 रोजी एन्काऊंटर झालं होतं. पण त्याआधीच इशरत आणि इतर तिघांची हत्या करण्यात आली होती. पण इशरत, तिचा मित्र जावेद, आणि अमजद अली आणि झिशान 15 जून 2004 रोजी झालेल्या पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाल्याचे क्राईम ब्रांचने सांगितलं होतं. हे चौघे लष्कर-ए-तोएबाचे अतिरेकी होते आणि त्यांचा मुख्यमंत्री मोदी यांच्या हत्येचा कट असल्याचा दावा तत्कालीन क्राईम ब्रांचचे अधिकारी डी. जी. वंझारा यांनी केला होता. वंझारा सध्या तुरुंगात आहेत. याप्रकरणी स्वतंत्र न्यायालयीन तपास करण्यात आला होता. क्राईम ब्रांचचा दावा चुकीचा असल्याचा निष्कर्ष न्यायमूर्ती एस पी तमांग यांनी काढला होता. इशरतसह इतर तिघांच्या मृत्यूनंतर घटनास्थळी हत्यारं पेरण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. डी. जी. वंझारा आणि अमित शहा या दोन आयपीएस अधिकार्‍यांमुळे मोदींच्या अडचणी वाढल्या आहेत. हे दोघे सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटरमध्येही आरोपी आहेत. आणि त्यांनीच इशरतच्या एन्काऊंटरचा कट रचल्याचा आरोप विरोधकांनी केला. आता सर्व पोलीस अधिकार्‍यांवर खुनाचा गुन्हा दाखल होईल आणि त्यानंतर प्रकरणाची सुनावणी सुरु होईल. एन्काऊंटर बनावट होतं, हे सांगण्यासाठी सात वर्ष लागली. आता दोषींना शिक्षा लवकरात लवकर मिळावी अशीच इशरतच्या कुटुंबीयांची मागणी आहे. आपल्या मुलीची विनाकारण हत्या करण्यात आलीय, असं इशरतची आई शमिमा कौसर यांनी म्हटलं आहे. तर तिच्या हत्या करणार्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी इशरतचा भाऊ अन्वरने केली आहे. आपल्या मुलाच्या हत्येप्रकरणी गुजरात सरकारलाच शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी जावेद शेख उर्फ पिल्लई याचे वडील गोपीनाथ पिल्लई यांनी केली. या प्रकरणातील कायदेशीर घडामोडी - 15 जून 2004 - अहमदाबादजवळ इशरत जहाँ आणि इतर तिघांचं एन्काऊंटर- हे सर्वजण लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी होते, अहमदाबाद पोलिसांचा दावा- नरेंद्र मोदींची हत्या करण्याचा त्यांचा डाव होता, असा अहमदाबाद पोलिसांचा दावा- सप्टेंबर 2009 - एन्काऊंटर बनावट असल्याचा अहमदाबाद महानगर न्यायदंडाधिकार्‍यांचा निर्णय - ऑगस्ट 2010 - सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या SIT नं तपास करावा, गुजरात हायकोर्टाचे आदेश- सप्टेंबर 2010 - SIT चे प्रमुख आर. के. राघवन यांनी तपास करायला असमर्थता दाखवली - सप्टेंबर 2010 - गुजरात हायकोर्टाने नव्या SIT ची स्थापना केली - नोव्हेंबर 2010 - SIT च्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली- डिसेंबर 2010 - तीन सदस्यांच्या SIT नं तपास सुरू केला - 28 जानेवारी 2011 - एन्काऊंटर बनावट असल्याचं प्रतिज्ञापत्र SIT चे सदस्य सतीश वर्मा यांनी दाखल केलं- इतर सदस्य तपास निष्पक्षपातीपणे करत नसल्याचा आरोप - 8 एप्रिल 2011 - हा तपास सीबीआय किंवा NIA कडे देण्याचा हायकोर्टाचा इशारा - 18 नाव्हेंबर 2011 - SIT नं अहवाल कोर्टात सादर केला

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2011 09:59 AM IST

इशरत जहाँ एन्काऊंटर बनावट : एसआयटी

21 नोव्हेंबर

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना धक्का देणारा निकाल आज गुजरात हायकोर्टाने दिला. 2004 साली अहमदाबादजवळ एक एन्काऊंटर झालं होतं. त्यात मुंब्रामध्ये राहणारी इशरत जहाँ नावाची तरुणी आणि तिच्या सोबत असलेले तिघं ठार झाले. पण हे एन्काऊंटर बनावट होतं, खोटं होतं, असा अहवाल स्पेशल इन्वेस्टिगेशन टीमने दिला. त्यामुळे गुजरात हायकोर्टाने 14 दोषी पोलिसांविरोधात खुनाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या बनावट एन्काऊंटर प्रकरणी SIT च्या अहवालात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 15 जून 2004 रोजी एन्काऊंटर झालं होतं. पण त्याआधीच इशरत आणि इतर तिघांची हत्या करण्यात आली होती. पण इशरत, तिचा मित्र जावेद, आणि अमजद अली आणि झिशान 15 जून 2004 रोजी झालेल्या पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाल्याचे क्राईम ब्रांचने सांगितलं होतं. हे चौघे लष्कर-ए-तोएबाचे अतिरेकी होते आणि त्यांचा मुख्यमंत्री मोदी यांच्या हत्येचा कट असल्याचा दावा तत्कालीन क्राईम ब्रांचचे अधिकारी डी. जी. वंझारा यांनी केला होता. वंझारा सध्या तुरुंगात आहेत.

याप्रकरणी स्वतंत्र न्यायालयीन तपास करण्यात आला होता. क्राईम ब्रांचचा दावा चुकीचा असल्याचा निष्कर्ष न्यायमूर्ती एस पी तमांग यांनी काढला होता. इशरतसह इतर तिघांच्या मृत्यूनंतर घटनास्थळी हत्यारं पेरण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. डी. जी. वंझारा आणि अमित शहा या दोन आयपीएस अधिकार्‍यांमुळे मोदींच्या अडचणी वाढल्या आहेत. हे दोघे सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटरमध्येही आरोपी आहेत. आणि त्यांनीच इशरतच्या एन्काऊंटरचा कट रचल्याचा आरोप विरोधकांनी केला.

आता सर्व पोलीस अधिकार्‍यांवर खुनाचा गुन्हा दाखल होईल आणि त्यानंतर प्रकरणाची सुनावणी सुरु होईल. एन्काऊंटर बनावट होतं, हे सांगण्यासाठी सात वर्ष लागली. आता दोषींना शिक्षा लवकरात लवकर मिळावी अशीच इशरतच्या कुटुंबीयांची मागणी आहे. आपल्या मुलीची विनाकारण हत्या करण्यात आलीय, असं इशरतची आई शमिमा कौसर यांनी म्हटलं आहे. तर तिच्या हत्या करणार्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी इशरतचा भाऊ अन्वरने केली आहे. आपल्या मुलाच्या हत्येप्रकरणी गुजरात सरकारलाच शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी जावेद शेख उर्फ पिल्लई याचे वडील गोपीनाथ पिल्लई यांनी केली.

या प्रकरणातील कायदेशीर घडामोडी

- 15 जून 2004 - अहमदाबादजवळ इशरत जहाँ आणि इतर तिघांचं एन्काऊंटर- हे सर्वजण लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी होते, अहमदाबाद पोलिसांचा दावा- नरेंद्र मोदींची हत्या करण्याचा त्यांचा डाव होता, असा अहमदाबाद पोलिसांचा दावा

- सप्टेंबर 2009 - एन्काऊंटर बनावट असल्याचा अहमदाबाद महानगर न्यायदंडाधिकार्‍यांचा निर्णय - ऑगस्ट 2010 - सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या SIT नं तपास करावा, गुजरात हायकोर्टाचे आदेश- सप्टेंबर 2010 - SIT चे प्रमुख आर. के. राघवन यांनी तपास करायला असमर्थता दाखवली - सप्टेंबर 2010 - गुजरात हायकोर्टाने नव्या SIT ची स्थापना केली - नोव्हेंबर 2010 - SIT च्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली- डिसेंबर 2010 - तीन सदस्यांच्या SIT नं तपास सुरू केला - 28 जानेवारी 2011 - एन्काऊंटर बनावट असल्याचं प्रतिज्ञापत्र SIT चे सदस्य सतीश वर्मा यांनी दाखल केलं- इतर सदस्य तपास निष्पक्षपातीपणे करत नसल्याचा आरोप - 8 एप्रिल 2011 - हा तपास सीबीआय किंवा NIA कडे देण्याचा हायकोर्टाचा इशारा - 18 नाव्हेंबर 2011 - SIT नं अहवाल कोर्टात सादर केला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2011 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close