S M L

साध्वीच्या अटकेवरून काँग्रेस-भाजपची एकमेकांवर टीका

19 नोव्हेंबर, दिल्लीपल्लवी घोषभगव्या दहशतवादावरून आता खुलेआम राजकारण सुरू झालंय. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी मालेगाव बॉम्बस्फोट तपास काँग्रेस प्रेरित आहे असा आरोप केला, तर या आरोपाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला.साध्वी प्रज्ञा सिंग सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पण भाजप आणि काँग्रेसनं मात्र या मुद्यावर एकमेकांवर कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांनीही भाजपवर हल्ला चढवला आहे. 'भाजपनं साध्वीच्या प्रकरणी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे' असं राहुलनं म्हटलं. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या प्रज्ञा सिंगचा भाजप आणि विहिपच्या नेत्यांशी जवळचा संबंध होता, यावरूनच राहुल गांधी यांनी हे विधान केलं .राहुल गांधींनी भाजपवर ज्यावेळी टीका केली. त्याच वेळी भाजप नेते आडवाणी यांनी महाराष्ट्र एटीएस टीममध्ये बदल करण्यात यावा आणि साध्वी प्रज्ञा सिंगच्या मारहाण प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. ' एखाद्या तत्त्वनिष्ठ व्यक्तीला, विशेषतः स्त्रीला अशी घृणास्पद वागणूक मिळ ते, यावर विश्वासच बसत नाही. भारतासारख्या कायद्याचं राज्य असलेल्या लोकशाहीवादी देशाला हे लज्जास्पद आहे' असं तो म्हणाले.साध्वीच्या प्रकरणाचं सध्या चागलंच राजकारण सुरू आहे. साध्वीचा मालेगाव बॉम्बस्फोटात असलेला सहभाग आणि भाजप नेत्यांशी असलेल्या संबंधांमुळं काँग्रेसला भाजपवर टीका करायला आयताच मुद्दा मिळालाय, तर त्याच वेळी साध्वीचं समर्थन करून आपली पारंपरिक व्होट बँक टिकवण्याचा भाजपचा प्रयत्नही या निमित्ताने उघड झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2008 05:13 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2008 05:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close