S M L

स्वप्नील जोशी कस्टम्सच्या ताब्यात

22 नोव्हेंबरप्रसिध्द अभिनेता स्वप्नील जोशीला मंुबई एअरपोर्टवर कस्टम विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. स्वप्नीलकडे 2 लाख रुपये रोख रक्कम सापडलीय. तो बँकॉकवरुन परतला होता. कस्टम नियमानुसार परदेशातून भारतात येताना साडेसात हजारांपेक्षा जास्त भारतीय चलन बाळगता येत नाही. जास्त रक्कम असल्यास ती घोषित करावी लागते. पण, स्वप्नीलकडे साडेसात हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम आढळून आली आणि त्यानं या रक्कमबाबत कस्टम विभागाला माहितीही दिली नव्हती. स्वप्निलसह कॉमेडी सर्कसमधला वीआयपी हा कॉमेडी कलाकार आणि स्वप्नीलच्या एका मित्रालाही कस्टम विभागाने ताब्यात घेतलं आहे. स्वप्निलने हे पैसे कुठून आणलेत याबाबत चौकशी केली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2011 10:53 AM IST

स्वप्नील जोशी कस्टम्सच्या ताब्यात

22 नोव्हेंबर

प्रसिध्द अभिनेता स्वप्नील जोशीला मंुबई एअरपोर्टवर कस्टम विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. स्वप्नीलकडे 2 लाख रुपये रोख रक्कम सापडलीय. तो बँकॉकवरुन परतला होता. कस्टम नियमानुसार परदेशातून भारतात येताना साडेसात हजारांपेक्षा जास्त भारतीय चलन बाळगता येत नाही. जास्त रक्कम असल्यास ती घोषित करावी लागते. पण, स्वप्नीलकडे साडेसात हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम आढळून आली आणि त्यानं या रक्कमबाबत कस्टम विभागाला माहितीही दिली नव्हती. स्वप्निलसह कॉमेडी सर्कसमधला वीआयपी हा कॉमेडी कलाकार आणि स्वप्नीलच्या एका मित्रालाही कस्टम विभागाने ताब्यात घेतलं आहे. स्वप्निलने हे पैसे कुठून आणलेत याबाबत चौकशी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2011 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close