S M L

अजित वाडेकरांना सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार

22 नोव्हेंबरमाजी क्रिकेटर अजित वाडेकर यांना यंदाचा सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय क्रिकेट मधील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. गौरव चिन्ह आणि रोख 15 लाख रुपये असे या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या 10 डिसेंबरला या पुरस्काराचे चेन्नईत वितरण करण्यात येणार आहे. वाडेकर यांनी वेस्ट इंडिज व इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. भारतीय क्रिकेट टीमचे एक यशस्वी कॅप्टन म्हणून अजित वाडेकर यांच्याकडे पाहिलं जातं. आपल्या 9 वर्षांच्या कारकिर्दीत वाडेकर यांनी भारतीय टीमला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. अजित वाडेकर यांची क्रिकेट कारकिर्द अजित वाडेकर यांनी 1966मध्ये वेस्टइंडिजविरुध्द टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 1974 ला ते आपली शेवटची टेस्ट मॅच खेळले. आपल्या 8 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत ते एकुण 37 टेस्ट मॅच खेळले. आणि यात त्यांनी 2113 रन्सही केली. तर 1 सेंच्युरी त्यांच्या नावावर आहे. वाडेकर यांच्या नावावर वन डे क्रिकेटची ही नोंद आहे. 1974 ला ते पहिली वन डे मॅच खेळले. पण केवळ 2 वन डे मॅचच ते खेळले. यात त्यांनी 73 रन्स केले. भारतीय टीमचे कॅप्टन म्हणून वाडेकर 16 टेस्ट मॅच खेळले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 4 मॅचमध्ये विजय मिळवला. विशेष म्हणजे 1971 ला त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताने वेस्टइंडिज आणि इंग्लंडच्या धर्तीवर पहिला टेस्ट विजय मिळवला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2011 05:42 PM IST

अजित वाडेकरांना सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार

22 नोव्हेंबर

माजी क्रिकेटर अजित वाडेकर यांना यंदाचा सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय क्रिकेट मधील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. गौरव चिन्ह आणि रोख 15 लाख रुपये असे या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या 10 डिसेंबरला या पुरस्काराचे चेन्नईत वितरण करण्यात येणार आहे. वाडेकर यांनी वेस्ट इंडिज व इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. भारतीय क्रिकेट टीमचे एक यशस्वी कॅप्टन म्हणून अजित वाडेकर यांच्याकडे पाहिलं जातं. आपल्या 9 वर्षांच्या कारकिर्दीत वाडेकर यांनी भारतीय टीमला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले.

अजित वाडेकर यांची क्रिकेट कारकिर्द

अजित वाडेकर यांनी 1966मध्ये वेस्टइंडिजविरुध्द टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 1974 ला ते आपली शेवटची टेस्ट मॅच खेळले. आपल्या 8 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत ते एकुण 37 टेस्ट मॅच खेळले. आणि यात त्यांनी 2113 रन्सही केली. तर 1 सेंच्युरी त्यांच्या नावावर आहे. वाडेकर यांच्या नावावर वन डे क्रिकेटची ही नोंद आहे. 1974 ला ते पहिली वन डे मॅच खेळले. पण केवळ 2 वन डे मॅचच ते खेळले. यात त्यांनी 73 रन्स केले. भारतीय टीमचे कॅप्टन म्हणून वाडेकर 16 टेस्ट मॅच खेळले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 4 मॅचमध्ये विजय मिळवला. विशेष म्हणजे 1971 ला त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताने वेस्टइंडिज आणि इंग्लंडच्या धर्तीवर पहिला टेस्ट विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2011 05:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close