S M L

आमदार गिरीष महाजनांची प्रकृती खालावली

22 नोव्हेंबरकापसाच्या वाढीव हमीभावासाठी जळगावमध्ये भाजप आमदार गिरीष महाजन यांचे उपोषण अजूनही सुरूच आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. महाजन यांचं वजन साडे चार किलोने घटलं आहे. सिव्हिल हॉस्पिटलची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. महाजन यांची तब्येत चिंताजनक आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाजनांना फोन करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण 23 तारखेला मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शेतकर्‍यांचा भल्याचा काय निर्णय होतो यानंतर उपोषण सोडण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं महाजनांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी सध्या उपोषण सोडण्यास नकार दिला आहे. दरम्यान या आंदोलनाला शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे. शिवसेना नेते आमदार सुरेशदादा जैन आणि उपनेते गुलाबराव पाटिल यांनीही कार्यकर्त्यांसह महाजन यांची भेट घेतली. पश्चिम महाराष्ट्राला मंत्रिमंडळात संख्याबळाने चांगले प्रतिनिधीत्व असल्याने त्या भागातील शेतकर्‍यांचे प्रश्न हे लागलीच सुटतात.आणि म्हणूनंच उत्तर महाराष्ट्रातील प्रश्नांकडे मंत्रिमंडळाचे दुर्लक्ष आहे असा आरोप खान्देशातील नेत्यांनी केला आहे. दरम्यान आमदार गिरीष महाजन यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पत्र लिहून कापूस आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2011 03:20 PM IST

आमदार गिरीष महाजनांची प्रकृती खालावली

22 नोव्हेंबर

कापसाच्या वाढीव हमीभावासाठी जळगावमध्ये भाजप आमदार गिरीष महाजन यांचे उपोषण अजूनही सुरूच आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. महाजन यांचं वजन साडे चार किलोने घटलं आहे. सिव्हिल हॉस्पिटलची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. महाजन यांची तब्येत चिंताजनक आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाजनांना फोन करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण 23 तारखेला मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शेतकर्‍यांचा भल्याचा काय निर्णय होतो यानंतर उपोषण सोडण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं महाजनांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी सध्या उपोषण सोडण्यास नकार दिला आहे.

दरम्यान या आंदोलनाला शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे. शिवसेना नेते आमदार सुरेशदादा जैन आणि उपनेते गुलाबराव पाटिल यांनीही कार्यकर्त्यांसह महाजन यांची भेट घेतली. पश्चिम महाराष्ट्राला मंत्रिमंडळात संख्याबळाने चांगले प्रतिनिधीत्व असल्याने त्या भागातील शेतकर्‍यांचे प्रश्न हे लागलीच सुटतात.आणि म्हणूनंच उत्तर महाराष्ट्रातील प्रश्नांकडे मंत्रिमंडळाचे दुर्लक्ष आहे असा आरोप खान्देशातील नेत्यांनी केला आहे. दरम्यान आमदार गिरीष महाजन यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पत्र लिहून कापूस आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2011 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close