S M L

स्पेक्ट्रम लिलावापूर्वी चिदंबरम-राजा झाली होती बैठक -स्वामी

22 नोव्हेंबरजनता पक्षाचे अध्यक्ष आणि 2 जी घोटाळा प्रकरणातले याचिकाकर्ते सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. जी स्पेक्ट्रमच्या लिलावापूर्वी माजी अर्थमंत्री आणि सध्याचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी तसेच ए. राजा यांच्यात बैठक झाली होती. आणि स्पेक्ट्रच्या किंमतीवर त्यात चर्चा झाली होती, असं स्वामी यांनी म्हटलं आहे. 29 मे 2008 आणि 12 जून 2008 अशा दोन बैठका त्यांच्यात झाल्या होत्या, असा दावा स्वामी यांनी केला. याचाच अर्थ चिदंबमरम यांच्या मंजुरीनंतरच 2 जी स्पेक्ट्रमच्या किंमती ठरल्या होत्या, असं स्वामी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, 2 जी घोटाळ्याचा खटला यापुढे तिहार जेलमध्ये चालेल असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहे. दिल्ली हायकोर्टाने स्वतःहून अशी नोटीस दिलीय. स्पेशल सीबीआय न्यायाधीशांनी याबाबतची माहिती या घोटाळ्यातल्या आरोपींना दिलीय. येत्या गुरुवारपासून या खटल्याची सुनावणी तिहार जेलमध्ये होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2011 05:37 PM IST

स्पेक्ट्रम लिलावापूर्वी चिदंबरम-राजा  झाली होती बैठक -स्वामी

22 नोव्हेंबर

जनता पक्षाचे अध्यक्ष आणि 2 जी घोटाळा प्रकरणातले याचिकाकर्ते सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. जी स्पेक्ट्रमच्या लिलावापूर्वी माजी अर्थमंत्री आणि सध्याचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी तसेच ए. राजा यांच्यात बैठक झाली होती. आणि स्पेक्ट्रच्या किंमतीवर त्यात चर्चा झाली होती, असं स्वामी यांनी म्हटलं आहे. 29 मे 2008 आणि 12 जून 2008 अशा दोन बैठका त्यांच्यात झाल्या होत्या, असा दावा स्वामी यांनी केला. याचाच अर्थ चिदंबमरम यांच्या मंजुरीनंतरच 2 जी स्पेक्ट्रमच्या किंमती ठरल्या होत्या, असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 2 जी घोटाळ्याचा खटला यापुढे तिहार जेलमध्ये चालेल असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहे. दिल्ली हायकोर्टाने स्वतःहून अशी नोटीस दिलीय. स्पेशल सीबीआय न्यायाधीशांनी याबाबतची माहिती या घोटाळ्यातल्या आरोपींना दिलीय. येत्या गुरुवारपासून या खटल्याची सुनावणी तिहार जेलमध्ये होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2011 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close