S M L

नगरसेवकांनीच फिरवली पालिकेच्या लायब्ररीकडे पाठ !

23 नोव्हेंबरमुंबई महापालिका देशातली सर्वात श्रीमंत महापालिका...इथला नगरसेवक आमदारापेक्षा अधिक सशक्त मानला जातो. पण हे नगरसेवक मात्र अपवादानेच इथल्या लायब्ररीमधे फिरकताना दिसतात. एकीकडे मनसेचे सेनापती राज ठाकरे लेखी परीक्षा घ्यायचं म्हणतायत. पण मनसेचे नगरसेवकही या लायब्ररीपासुन दूरच आहेत.मनसे एकीकडे इच्छुक उमेदवारांच्या लेखी परिक्षा घेणार आहे. तर अनेक राजकीय पक्षांकडून एन निवडणुकीच्या तोंडावर अभ्यासवर्ग आणि कार्यशाळा घेतल्या जात आहे. पण मुंबई महापालिकेच्या लायब्ररीकडे मात्र कोणत्याही नगरसेवकाची नियमित हजेरी पहायला मिळत नाही. गेल्या वर्षभरात तर फक्त पाच नगरसेवकांनी लायब्ररीतून पुस्तक वाचण्यासाठी नेली. तर मनसेच्या मुंबई महापालिकेच्या सात नगरसेवकांपैकी फक्त एका नगरसेवकांनेच लायब्ररीत गेल्या वर्षभरात फेरफटका मारला. गेल्या वर्षभरात कोणी, कधी पुस्तक वाचनासाठी नेली 'वाचक' नगरसेवक8 नोव्हेंबर 2011 रवींद्र वायकर,नगरसेवक, शिवसेना3 नोव्हेंबर 2011 विनोद शेखर,नगरसेवक, काँग्रेस8 ऑक्टोबर 2011 शुभा राउळ,माजी महापौर29 जुलै 2011 शुभा राउळ,माजी महापौर5 मार्च 2011 जगदीश सावंत,नगरसेवक ,शिवसेना 5 फेब्रुवारी 2011 परमेश्वर कदम,नगरसेवक,मनसे यांनी हजेरी लावली.तर काँग्रेसचे नगरसेवक बबलु बारुदगर - कधीच गेलो नाही.मित्र म्हणाले लायब्ररीत जावं अशी स्थिती नाही.शिवसेनेचे नगरसेवक मनमोहन चोणकर - तीन चारवेळा गेलोय.गरज असेल तेव्हा जातो.काँग्रेसचे नगरसेवक धर्मेश व्यास - 2006 साली गेलो होते. इम्प्रुव्हमेंट कमिटी माज्याकडे आली तेव्हा गेलो होतो.काँग्रेसचे नगरसेवक शिवजी सिंग - 3 महिन्यापूर्वी गेलो होतो.पण पुस्तक मिळायला तीनचार तास लागतात.वाचाल तर वाचाल ही म्हण,आपण शाळेत वाचलीय आणि एकली. पण या म्हणीचा मात्र नगरसेवकांना विसर पडला आहे. हाताच्या बोटावर मोजता येईल अशा मोजक्या नगरसेवकांव्यतिरिक्त इतरांनी या लायब्ररीकडे ढुंकुनही पाहिलेलं नाही.मनसेचे नगरसेवक,आमदार ज्यांनी कधीही लायब्ररीतुन पुस्तक नेल्याची नोंद नाही ते मंगेश सांगळे मात्र लायब्ररीच्या दुरावस्थेकडे बोट दाखवत आहे.मंगेश सांगळे म्हणतात, विधान भवनाची लायब्ररी बघा आणि महापालिकेची अत्यंत खेदानं सांगावसं वाटतं.शिवसेनेचे नगरसेवक मनमोहन चोणक र म्हणतात, मी ठरावाची उपसुचना मांडलीये.लायब्ररीची डेव्हलमेंट झाली पाहिजे. आता निवडणुकीच्या तोंडावर सुशिक्षित वर्गाची मत मिळावीत यासाठी भले कोणत्याही पक्षाकडून कितीही वल्गना होत असल्या तरी आड्यात नाही तर पोहर्‍यात येणार कुठुनं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2011 05:59 PM IST

नगरसेवकांनीच फिरवली पालिकेच्या लायब्ररीकडे पाठ !

23 नोव्हेंबर

मुंबई महापालिका देशातली सर्वात श्रीमंत महापालिका...इथला नगरसेवक आमदारापेक्षा अधिक सशक्त मानला जातो. पण हे नगरसेवक मात्र अपवादानेच इथल्या लायब्ररीमधे फिरकताना दिसतात. एकीकडे मनसेचे सेनापती राज ठाकरे लेखी परीक्षा घ्यायचं म्हणतायत. पण मनसेचे नगरसेवकही या लायब्ररीपासुन दूरच आहेत.

मनसे एकीकडे इच्छुक उमेदवारांच्या लेखी परिक्षा घेणार आहे. तर अनेक राजकीय पक्षांकडून एन निवडणुकीच्या तोंडावर अभ्यासवर्ग आणि कार्यशाळा घेतल्या जात आहे. पण मुंबई महापालिकेच्या लायब्ररीकडे मात्र कोणत्याही नगरसेवकाची नियमित हजेरी पहायला मिळत नाही. गेल्या वर्षभरात तर फक्त पाच नगरसेवकांनी लायब्ररीतून पुस्तक वाचण्यासाठी नेली. तर मनसेच्या मुंबई महापालिकेच्या सात नगरसेवकांपैकी फक्त एका नगरसेवकांनेच लायब्ररीत गेल्या वर्षभरात फेरफटका मारला.

गेल्या वर्षभरात कोणी, कधी पुस्तक वाचनासाठी नेली 'वाचक' नगरसेवक8 नोव्हेंबर 2011 रवींद्र वायकर,नगरसेवक, शिवसेना3 नोव्हेंबर 2011 विनोद शेखर,नगरसेवक, काँग्रेस8 ऑक्टोबर 2011 शुभा राउळ,माजी महापौर29 जुलै 2011 शुभा राउळ,माजी महापौर5 मार्च 2011 जगदीश सावंत,नगरसेवक ,शिवसेना 5 फेब्रुवारी 2011 परमेश्वर कदम,नगरसेवक,मनसे यांनी हजेरी लावली.

तर काँग्रेसचे नगरसेवक बबलु बारुदगर - कधीच गेलो नाही.मित्र म्हणाले लायब्ररीत जावं अशी स्थिती नाही.शिवसेनेचे नगरसेवक मनमोहन चोणकर - तीन चारवेळा गेलोय.गरज असेल तेव्हा जातो.काँग्रेसचे नगरसेवक धर्मेश व्यास - 2006 साली गेलो होते. इम्प्रुव्हमेंट कमिटी माज्याकडे आली तेव्हा गेलो होतो.काँग्रेसचे नगरसेवक शिवजी सिंग - 3 महिन्यापूर्वी गेलो होतो.पण पुस्तक मिळायला तीनचार तास लागतात.वाचाल तर वाचाल ही म्हण,आपण शाळेत वाचलीय आणि एकली. पण या म्हणीचा मात्र नगरसेवकांना विसर पडला आहे. हाताच्या बोटावर मोजता येईल अशा मोजक्या नगरसेवकांव्यतिरिक्त इतरांनी या लायब्ररीकडे ढुंकुनही पाहिलेलं नाही.

मनसेचे नगरसेवक,आमदार ज्यांनी कधीही लायब्ररीतुन पुस्तक नेल्याची नोंद नाही ते मंगेश सांगळे मात्र लायब्ररीच्या दुरावस्थेकडे बोट दाखवत आहे.मंगेश सांगळे म्हणतात, विधान भवनाची लायब्ररी बघा आणि महापालिकेची अत्यंत खेदानं सांगावसं वाटतं.शिवसेनेचे नगरसेवक मनमोहन चोणक र म्हणतात, मी ठरावाची उपसुचना मांडलीये.लायब्ररीची डेव्हलमेंट झाली पाहिजे. आता निवडणुकीच्या तोंडावर सुशिक्षित वर्गाची मत मिळावीत यासाठी भले कोणत्याही पक्षाकडून कितीही वल्गना होत असल्या तरी आड्यात नाही तर पोहर्‍यात येणार कुठुनं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2011 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close