S M L

सचिन पाटील यांच्यावर मुलगा लपवण्याचा आरोप

26 नोव्हेंबरराज्यपालांचे एडीसी (ADC) आणि आयपीएस (IPS) आधिकारी सचिन पाटील अडचणीत आले आहेत. आपल्या चार वर्षाच्या मुलाला लपवल्याचा आरोप सचिन पाटील यांच्या पत्नी डॉ. तेजस्वीनी पाटील यांनी केला. मुलाचा ताबा घेण्यासाठी तेजस्वीनी यांनी कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाने मुलाची कस्टडी घेण्याची परवानगीसुद्धा दिली. आदेशानुसार तेजस्वीनी पाटील या तीनबत्ती पोलीस चौकीच्या पोलीस निरीक्षकांनी सचिन पाटील यांच्या राजभवनातल्या घरी गेल्या. पण घराची संपूर्ण झडती घेतल्यानंतरही त्यांना मुलगा सापडला नाही. एवढंच नाही तर एडीसी सचिन पाटील तासाभरात येतो म्हणून गेले ते संध्याकाळपर्यंत आलेच नाही. या झडतीचा अहवाल कोर्टाला सादर करावा, अशी तक्रार डॉ. तेजस्वीनी पाटील यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2011 01:33 PM IST

सचिन पाटील यांच्यावर मुलगा लपवण्याचा आरोप

26 नोव्हेंबर

राज्यपालांचे एडीसी (ADC) आणि आयपीएस (IPS) आधिकारी सचिन पाटील अडचणीत आले आहेत. आपल्या चार वर्षाच्या मुलाला लपवल्याचा आरोप सचिन पाटील यांच्या पत्नी डॉ. तेजस्वीनी पाटील यांनी केला. मुलाचा ताबा घेण्यासाठी तेजस्वीनी यांनी कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाने मुलाची कस्टडी घेण्याची परवानगीसुद्धा दिली. आदेशानुसार तेजस्वीनी पाटील या तीनबत्ती पोलीस चौकीच्या पोलीस निरीक्षकांनी सचिन पाटील यांच्या राजभवनातल्या घरी गेल्या. पण घराची संपूर्ण झडती घेतल्यानंतरही त्यांना मुलगा सापडला नाही. एवढंच नाही तर एडीसी सचिन पाटील तासाभरात येतो म्हणून गेले ते संध्याकाळपर्यंत आलेच नाही. या झडतीचा अहवाल कोर्टाला सादर करावा, अशी तक्रार डॉ. तेजस्वीनी पाटील यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2011 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close