S M L

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी सचिन पाटलांवर गुन्हा दाखल

28 नोव्हेंबरराज्यपालांचे एडीसी आणि आयपीएस आधिकारी सचिन पाटील अडचणीत आले आहेत. औरंगबादमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पत्नी तेजस्वीनी पाटील यांच्या तक्रारीवरुन सचिन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीचा छळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. आपला 4 वर्षांच्या मुलाला, सचिन पाटील आपल्याला देत नसल्याचा आरोप त्यांच्या पत्नी डॉ. तेजस्विनी पाटील यांनी केला. त्यांच्या पत्नी डॉ. तेजस्वीनी पाटील यांनी आपल्या 4 वर्षाच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी सेशन्स कोर्टात अर्ज केला होता. या प्रकरणी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तीनबत्ती पोलीस चौकीच्या पोलीस निरीक्षकांनी सचिन पाटील यांच्या राजभवनातल्या घरातली झडती घेतली पण त्यांना मुलगा सापडला नाही. त्यानंतर या झडतीचा अहवाल कोर्टाला सादर करावा, अशी तक्रार डॉ. तेजस्वीनी पाटील यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2011 08:19 AM IST

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी सचिन पाटलांवर गुन्हा दाखल

28 नोव्हेंबर

राज्यपालांचे एडीसी आणि आयपीएस आधिकारी सचिन पाटील अडचणीत आले आहेत. औरंगबादमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पत्नी तेजस्वीनी पाटील यांच्या तक्रारीवरुन सचिन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीचा छळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. आपला 4 वर्षांच्या मुलाला, सचिन पाटील आपल्याला देत नसल्याचा आरोप त्यांच्या पत्नी डॉ. तेजस्विनी पाटील यांनी केला.

त्यांच्या पत्नी डॉ. तेजस्वीनी पाटील यांनी आपल्या 4 वर्षाच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी सेशन्स कोर्टात अर्ज केला होता. या प्रकरणी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तीनबत्ती पोलीस चौकीच्या पोलीस निरीक्षकांनी सचिन पाटील यांच्या राजभवनातल्या घरातली झडती घेतली पण त्यांना मुलगा सापडला नाही. त्यानंतर या झडतीचा अहवाल कोर्टाला सादर करावा, अशी तक्रार डॉ. तेजस्वीनी पाटील यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2011 08:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close