S M L

अण्णा हजारे झळकणार ‘टाइम’ मासिकावर

27 नोव्हेंबरजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या भ्रष्टाचाराविरोधात जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनामुळे अण्णांची किर्ती देशासह परदेशात ही पोहचली. आधुनिक युगाचे गांधी अशी ख्यातीही अण्णांना प्राप्त झाली. अण्णांच्या आंदोलनाची दखल आता जगप्रसिध्द आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘टाइम’ मासिकांने घेतली आहे. ‘टाइम’ मासिकात प्रभावशाली व्यक्तींची दखल घेतली जाते.अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रात माहितीचा अधिकार ग्रामविकासाठी अशी अनेक आंदोलन केली त्यांची माहिती समस्त महाराष्ट्रवासीयांना आहेच. त्याचबरोबर जनलोकपाल विधेयकासाठी पुकारलेल्या आंदोलनात देशवासीयांनी अभुतपूर्व सहभाग घेतला आणि आजवर जे घडले नाही असा ऐतिहासिक विजय या आंदोलनाने प्राप्त केला. त्यामुळे टाइम मासिकाने या आंदोलनाची दखल घेणे मानाचे आहे. काल शनिवारी टाइमच्या फोटोग्राफर्सनी राळेगणमध्ये अण्णांचे फोटो सेशन केले.टाइम मासिकाने घेतलेली दखल आता अण्णांना प्रभावशाली व्यक्तींच्या पंक्तीत बसणार आहे.त्याचबरोबर महाराष्ट्राची नवी ओळख यानिमित्त जगाला होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2011 10:21 AM IST

अण्णा हजारे झळकणार ‘टाइम’ मासिकावर

27 नोव्हेंबरजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या भ्रष्टाचाराविरोधात जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनामुळे अण्णांची किर्ती देशासह परदेशात ही पोहचली. आधुनिक युगाचे गांधी अशी ख्यातीही अण्णांना प्राप्त झाली. अण्णांच्या आंदोलनाची दखल आता जगप्रसिध्द आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘टाइम’ मासिकांने घेतली आहे. ‘टाइम’ मासिकात प्रभावशाली व्यक्तींची दखल घेतली जाते.अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रात माहितीचा अधिकार ग्रामविकासाठी अशी अनेक आंदोलन केली त्यांची माहिती समस्त महाराष्ट्रवासीयांना आहेच. त्याचबरोबर जनलोकपाल विधेयकासाठी पुकारलेल्या आंदोलनात देशवासीयांनी अभुतपूर्व सहभाग घेतला आणि आजवर जे घडले नाही असा ऐतिहासिक विजय या आंदोलनाने प्राप्त केला. त्यामुळे टाइम मासिकाने या आंदोलनाची दखल घेणे मानाचे आहे. काल शनिवारी टाइमच्या फोटोग्राफर्सनी राळेगणमध्ये अण्णांचे फोटो सेशन केले.

टाइम मासिकाने घेतलेली दखल आता अण्णांना प्रभावशाली व्यक्तींच्या पंक्तीत बसणार आहे.त्याचबरोबर महाराष्ट्राची नवी ओळख यानिमित्त जगाला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2011 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close