S M L

अखेर कनिमोळींसह पाच आरोपींना जामीन

28 नोव्हेंबर2 जी घोटाळ्याप्रकरणी द्रमुकच्या खासदार आणि करुणानिधी यांची मुलगी कनिमोळी यांना अखेर जामीन मिळाला आहे. कनिमोळी यांच्यासह शरद कुमार, करीम मोरानी, राजीव अग्रवाल आणि आसिफ बलवा या इतर चार आरोपींनाही जामीन मिळाला आहे. पण सिद्धार्थ बेहुरा यांच्या जामिनाला मात्र सीबीआयने विरोध केला आहे. प्रत्येकी 5 लाख रुपये जातमुचलक्यावर या 5 जणांना हा जामीन मिळाला आहे. या जामीन प्रकरणी या सर्वांनी पटीयाला कोर्टात बाँड भरुन द्यायचा आहे. बॉड देण्याची प्रक्रीया झाल्यांतर लगेचंच त्यांची सुटका करण्यात येणार आहे. यासर्व आरोपींना देश सोडून जाण्यास मनाई घालण्यात आली आहे. सर्व आरोपींनी आपले पासपोर्ट कोर्टाकडे जमा करावे असे आदेश कोर्टाने दिले. गेल्या सहा महिन्यांपासून कनिमोळी तिहार तुरुंगात आहेत. त्यामुळे कनिमोळी यांना जामीन मिळाल्यामुळे द्रमुकच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. तर तामिळनाडूत द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. हे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2011 05:36 PM IST

अखेर कनिमोळींसह पाच आरोपींना जामीन

28 नोव्हेंबर

2 जी घोटाळ्याप्रकरणी द्रमुकच्या खासदार आणि करुणानिधी यांची मुलगी कनिमोळी यांना अखेर जामीन मिळाला आहे. कनिमोळी यांच्यासह शरद कुमार, करीम मोरानी, राजीव अग्रवाल आणि आसिफ बलवा या इतर चार आरोपींनाही जामीन मिळाला आहे. पण सिद्धार्थ बेहुरा यांच्या जामिनाला मात्र सीबीआयने विरोध केला आहे. प्रत्येकी 5 लाख रुपये जातमुचलक्यावर या 5 जणांना हा जामीन मिळाला आहे. या जामीन प्रकरणी या सर्वांनी पटीयाला कोर्टात बाँड भरुन द्यायचा आहे. बॉड देण्याची प्रक्रीया झाल्यांतर लगेचंच त्यांची सुटका करण्यात येणार आहे. यासर्व आरोपींना देश सोडून जाण्यास मनाई घालण्यात आली आहे. सर्व आरोपींनी आपले पासपोर्ट कोर्टाकडे जमा करावे असे आदेश कोर्टाने दिले. गेल्या सहा महिन्यांपासून कनिमोळी तिहार तुरुंगात आहेत. त्यामुळे कनिमोळी यांना जामीन मिळाल्यामुळे द्रमुकच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. तर तामिळनाडूत द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. हे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2011 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close