S M L

लोकप्रतिनिधींच्या गोंधळामुळे 24 कोटींचा फटका

29 नोव्हेंबरआधी कापूसप्रश्न, नंतर मोठ्या राज्यांच्या विभाजनाचा प्रश्न आणि गेल्या 4 दिवसांपासून गाजत असलेला थेट परकीय गुंतवणुकीचा मुद्दा यामुळे संसदेच कामकाजच होऊ शकलं नाही. गदारोळामुळे सतत कामकाज तहकूब होतं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहात गेलेल्या लोकप्रतिनिधींनी आजही संसदेत गोंधळच घातला आहेत. यामुळे प्रश्न मार्गी लागणं तर सोडाच पण उलट सामान्य जनतेचाच पैसा वाया जातोय.सलग सहाव्या दिवशी संसदेचं कामकाज ठप्प झालं.आणि यामुळे आपलं आतापर्यंत तब्बल 24 कोटींचे नुकसान झालं आहे. - दररोज दोन्ही सभागृहांच्या कामकाजावर 4 कोटींचा खर्च होतो - सहा दिवसांतल्या नुकसानीचा आकडा आहे 24 कोटी रु. - मागील हिवाळी अधिवेशन 2 जी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून वाया गेलं होतं - त्यामुळे करदात्यांचे तब्बल 230 कोटी रुपये पाण्यात गेले होते - गेल्या हिवाळी अधिवेशनात फक्त 7 तास 37 मिनिटं कामकाज झालं होतं - निच्चांकी कामकाजाचा गेल्या 25 वर्षांतला हा रेकॉर्ड होतागेल्या वर्षीच्या म्हणजे 2010 च्या हिवाळी अधिवेशनातही अशीच परिस्थिती होती. 2010 चं संपूर्ण हिवाळी अधिवेशन विरोधकांनी हाणून पाडलं आणि त्यामुळे नुकसान झालं तब्बल 230 कोटींचं. तर गेल्या 25 वर्षांत लोकसभेचं कामकाज सगळ्यात कमी म्हणजे केवळ 7 तास 37 मिनिटं इतकंच चाललं.संसदेचं कामकाज चालत नाही, याला विरोधकच जबाबदार आहेत, असा आरोप पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला. आणि तोडगा निघण्याची आशाही व्यक्त केली.तोडगा काढण्यासाठी सरकारने मंगळवारी सकाळी सर्वपक्षीय बैठक घेतली. पण FDI चा निर्णय मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकारला वेळ हवा, असं अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ट्रबल शूटर प्रणव मुखर्जी यांनी विरोधकांना सांगितले. पण सरकारला वेळ द्यायला विरोधक तयार नाहीत, त्यामुळे संसदेतला गुंता सुटण्याची चिन्हं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2011 09:21 AM IST

लोकप्रतिनिधींच्या गोंधळामुळे 24 कोटींचा फटका

29 नोव्हेंबर

आधी कापूसप्रश्न, नंतर मोठ्या राज्यांच्या विभाजनाचा प्रश्न आणि गेल्या 4 दिवसांपासून गाजत असलेला थेट परकीय गुंतवणुकीचा मुद्दा यामुळे संसदेच कामकाजच होऊ शकलं नाही. गदारोळामुळे सतत कामकाज तहकूब होतं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहात गेलेल्या लोकप्रतिनिधींनी आजही संसदेत गोंधळच घातला आहेत. यामुळे प्रश्न मार्गी लागणं तर सोडाच पण उलट सामान्य जनतेचाच पैसा वाया जातोय.सलग सहाव्या दिवशी संसदेचं कामकाज ठप्प झालं.आणि यामुळे आपलं आतापर्यंत तब्बल 24 कोटींचे नुकसान झालं आहे.

- दररोज दोन्ही सभागृहांच्या कामकाजावर 4 कोटींचा खर्च होतो - सहा दिवसांतल्या नुकसानीचा आकडा आहे 24 कोटी रु. - मागील हिवाळी अधिवेशन 2 जी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून वाया गेलं होतं - त्यामुळे करदात्यांचे तब्बल 230 कोटी रुपये पाण्यात गेले होते - गेल्या हिवाळी अधिवेशनात फक्त 7 तास 37 मिनिटं कामकाज झालं होतं - निच्चांकी कामकाजाचा गेल्या 25 वर्षांतला हा रेकॉर्ड होता

गेल्या वर्षीच्या म्हणजे 2010 च्या हिवाळी अधिवेशनातही अशीच परिस्थिती होती. 2010 चं संपूर्ण हिवाळी अधिवेशन विरोधकांनी हाणून पाडलं आणि त्यामुळे नुकसान झालं तब्बल 230 कोटींचं. तर गेल्या 25 वर्षांत लोकसभेचं कामकाज सगळ्यात कमी म्हणजे केवळ 7 तास 37 मिनिटं इतकंच चाललं.संसदेचं कामकाज चालत नाही, याला विरोधकच जबाबदार आहेत, असा आरोप पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला. आणि तोडगा निघण्याची आशाही व्यक्त केली.

तोडगा काढण्यासाठी सरकारने मंगळवारी सकाळी सर्वपक्षीय बैठक घेतली. पण FDI चा निर्णय मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकारला वेळ हवा, असं अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ट्रबल शूटर प्रणव मुखर्जी यांनी विरोधकांना सांगितले. पण सरकारला वेळ द्यायला विरोधक तयार नाहीत, त्यामुळे संसदेतला गुंता सुटण्याची चिन्हं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2011 09:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close