S M L

रिटेलला विरोध करणार्‍या भाजपच्या अध्यक्षांचेच सुपर मार्केट

29 नोव्हेंबररिटेलमधल्या 51 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला भाजपने कडाडून विरोध केला. यामुळे किराणा दुकानांवर गदा येईल, असा भाजपचा आक्षेप आहे. तर लोकसभेतही आजचे कामकाज विरोधकांनी बंद पाडले आहे. तर भाजपने या मुद्द्यावरून देशभरामध्ये आज आंदोलनं सुरू केली. पण दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची नागपूरमध्ये सुपरमार्केट्स आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे या सुपरमार्केटमुळे शेजारच्या किराणा दुकानदारांवर कोणताही परिणाम झालेला नाही. असं खुद्द तिथल्या दुकानदारांचंच म्हणणं आहे. विशेष म्हणजे गडकरी यांचं पूर्ती सुपरमार्केटच्या शहरात चार शाखा होत्या. यापैकी हे एक सुपरमार्केट सुरू आहे. या मार्केटच्या बोर्डवर संस्थापक, संचालक, मार्गदर्शक म्हणून नितीन गडकरींचं नाव आहे. रिटेलवरून रान उठवणार्‍या भाजपचा दुटप्पीपणा एका प्रकारेसमोर आला आहे हे यावरुन स्पष्ट होतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2011 06:09 PM IST

रिटेलला विरोध करणार्‍या भाजपच्या अध्यक्षांचेच सुपर मार्केट

29 नोव्हेंबर

रिटेलमधल्या 51 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला भाजपने कडाडून विरोध केला. यामुळे किराणा दुकानांवर गदा येईल, असा भाजपचा आक्षेप आहे. तर लोकसभेतही आजचे कामकाज विरोधकांनी बंद पाडले आहे. तर भाजपने या मुद्द्यावरून देशभरामध्ये आज आंदोलनं सुरू केली. पण दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची नागपूरमध्ये सुपरमार्केट्स आहेत.

आणि महत्त्वाचे म्हणजे या सुपरमार्केटमुळे शेजारच्या किराणा दुकानदारांवर कोणताही परिणाम झालेला नाही. असं खुद्द तिथल्या दुकानदारांचंच म्हणणं आहे. विशेष म्हणजे गडकरी यांचं पूर्ती सुपरमार्केटच्या शहरात चार शाखा होत्या. यापैकी हे एक सुपरमार्केट सुरू आहे. या मार्केटच्या बोर्डवर संस्थापक, संचालक, मार्गदर्शक म्हणून नितीन गडकरींचं नाव आहे. रिटेलवरून रान उठवणार्‍या भाजपचा दुटप्पीपणा एका प्रकारेसमोर आला आहे हे यावरुन स्पष्ट होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2011 06:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close