S M L

पुण्यातल्या मुली हाँगकाँगच्या दौ-यावर

19 नोव्हेंबर पुणेप्राची कुलकर्णी पुण्यातल्या मुलींच्या रग्बी टीमला चक्क हाँगकाँगच्या टीमनं खेळण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. या रग्बी खेळणा-या मुलींची पहिली नॅशनल टुर्नामेंट येत्या 22 तारखेला पुण्यात होणार आहे. रग्बी आणि मुली? आश्चर्य वाटलं ना? सर्वच क्षेत्रात पुढे येणा-या मुली आता रग्बी सारखा रांगडा खेळही खेळत आहेत. आत्तापर्यंत त्या आपापसातच खेळत होत्या मात्र या टुर्नामेंटच्या निमित्ताने त्यांना नवा मार्ग सापडला आहे.या मुलींचं हे स्वप्न पूर्ण झालं सुहृद खरेंच्या अ‍ॅकॅडमीमध्ये. या अ‍ॅकेडमीचे खरेसर सुरुवातीला मुलांना ट्रेनिंग द्यायचे. मध्यंतरी त्यांच्याकडे एक मुलगी शिकायला यायची. त्यातूनच त्यांना ही कल्पना सुचली. रग्बी कोच, सुहृद खरे सांगतात, मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा लोक मुलींच्या टीमवरून वेड्यात काढायचे.22 तारखेला पुण्यात होणा-या या टुर्नामेंटमध्ये पुणे आणि हाँगकाँगबरोबरच देशातल्या 5 टीम सहभागी होणार आहेत. अशा प्रकारची ही देशातली पहिलीच टुर्नामेंट ठरणार आहे.त्यासाठीच मुलींची ही धडपड चालू आहे. या टुर्नामेंटसाठीची सगळी कसरतही या मुलीच करत आहेत आणि त्यासाठी पैशांची जमवाजमवही त्यांनाच करावी लागत आहे. केवळ रग्बीच्या प्रेमापोटी त्या हे करायला तयार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2008 12:46 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2008 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close