S M L

राज्याच्या मानचिन्हांवर चिखलफेक नको - उध्दव ठाकरे

07 डिसेंबरपेडर रोड फ्लायओवरच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष रंगणार आहे. राज ठाकरेंनी काल पेडर रोड झालाच पाहिजे ही भूमिका जाहीर करताना मुठभर उच्चभ्रूंसाठी सरकारला निर्णय बदलता येणार नाही, असा इशारा राज यांनी दिला. या फ्लायओव्हरला लता मंगेशकर यांनीही विरोध दर्शवला आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी मंगेशकर यांचं नाव न घेता ही टीका केली होती. पण आता या वादात उद्धव ठाकरेंनी उडी घेतली आहे. सचिनसाठी एफएसआय FSI मागणारे मंगेशकर कुंटुंबीयावर टीका करतात असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला. फ्लायओवरच निमीत्त करुन महाराष्ट्राच्या मानचिन्हांवर चिखलफेक सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. पेडर रोडवर फ्लायओव्हर गरजेचा असेल तर तो झालाच पाहिजे, पण त्यासाठी लता मंगेशकरांसारख्या व्यक्तीवर टीका नको असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. उध्दव ठाकरे यांचं पत्रलता मंगेशकर, आशा भोसले, सचिन तेंडुलकर ही महाराष्ट्राची मानचिन्हं आहेत. त्यांचा सन्मान व्हायलाच पाहिजे. या मानचिन्हांमुळेच देशात आणि जगातही महाराष्ट्राची ओळख वाढली आहे. त्यांच्या प्रतिमेस तडे जातील असे निदान महाराष्ट्रातील राजकारण्यांनी तरी वागू नये. लोकांची गरज आणि मागणी असेल तर पेडर रोडच काय, मुंबईत कुठेही उड्डाणपूल करण्याचा अधिकार सरकारला आहे. कायद्यापुढे सर्वच नागरिक समान आहेत, पण सरकारी नियमात बसत नसतानाही सचिन तेंडुलकरच्या बंगल्यासाठी वाढीव FSI देण्याची मागणी ज्यांनी केली, तेच लोक पेडर रोड पुलाच्या निमित्ताने लता मंगेशकर, आशा भोसले यांना टीकेचं लक्ष्य करतात याचे आश्चर्य वाटते. - उद्धव ठाकरे

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2011 10:49 AM IST

राज्याच्या मानचिन्हांवर चिखलफेक नको - उध्दव ठाकरे

07 डिसेंबर

पेडर रोड फ्लायओवरच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष रंगणार आहे. राज ठाकरेंनी काल पेडर रोड झालाच पाहिजे ही भूमिका जाहीर करताना मुठभर उच्चभ्रूंसाठी सरकारला निर्णय बदलता येणार नाही, असा इशारा राज यांनी दिला. या फ्लायओव्हरला लता मंगेशकर यांनीही विरोध दर्शवला आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी मंगेशकर यांचं नाव न घेता ही टीका केली होती. पण आता या वादात उद्धव ठाकरेंनी उडी घेतली आहे. सचिनसाठी एफएसआय FSI मागणारे मंगेशकर कुंटुंबीयावर टीका करतात असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला. फ्लायओवरच निमीत्त करुन महाराष्ट्राच्या मानचिन्हांवर चिखलफेक सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. पेडर रोडवर फ्लायओव्हर गरजेचा असेल तर तो झालाच पाहिजे, पण त्यासाठी लता मंगेशकरांसारख्या व्यक्तीवर टीका नको असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

उध्दव ठाकरे यांचं पत्र

लता मंगेशकर, आशा भोसले, सचिन तेंडुलकर ही महाराष्ट्राची मानचिन्हं आहेत. त्यांचा सन्मान व्हायलाच पाहिजे. या मानचिन्हांमुळेच देशात आणि जगातही महाराष्ट्राची ओळख वाढली आहे. त्यांच्या प्रतिमेस तडे जातील असे निदान महाराष्ट्रातील राजकारण्यांनी तरी वागू नये. लोकांची गरज आणि मागणी असेल तर पेडर रोडच काय, मुंबईत कुठेही उड्डाणपूल करण्याचा अधिकार सरकारला आहे. कायद्यापुढे सर्वच नागरिक समान आहेत, पण सरकारी नियमात बसत नसतानाही सचिन तेंडुलकरच्या बंगल्यासाठी वाढीव FSI देण्याची मागणी ज्यांनी केली, तेच लोक पेडर रोड पुलाच्या निमित्ताने लता मंगेशकर, आशा भोसले यांना टीकेचं लक्ष्य करतात याचे आश्चर्य वाटते. - उद्धव ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2011 10:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close