S M L

अण्णांचा हिंसाचारालाच पाठिंबा - शरद पवार

07 डिसेंबरआपल्यावर झालेल्या हल्ल्याचे समर्थन करून अण्णा हजारेंनी हिंसाचाराला पाठिंबा दिलाय अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. अण्णांच्या मनात माझ्याविषयी द्वेष आहे. माझ्यावर पुन्हा शारीरिक हल्ला झाल्यास ती कोणाची चिथावणी असेल ती सांगण्याची गरज नाही अशा शब्दांत शरद पवारांनी अण्णा हजारेंवर टीका केली. काही दिवसांपूर्वी हरविंदर सिंग या माथेफिरु तरुणाने शरद पवारांवर हल्ला केला होता. त्यानंतर अण्णांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन चांगलाच वाद झाला होता. त्यानंतर काल अण्णांनी ब्लॉगमधूनही शरद पवारांवर टीका केली होती. त्याला आज पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. तसेच लोकांनी अण्णांच्या भूमिकेकडे संयमानं पहावं आणि कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करू नये असं आवाहनही शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केलं.काल ब्लॉगमधून अण्णांनी पवारांवर नेमकी काय टीका केली ?समाज आणि राष्ट्रहितासाठी कठोर शब्दांची हिंसा मी अनेक वर्षे वारंवार करत आलो आहे. 'एकही थप्पड मारा?' हीसुद्धा माझ्याकडून हिंसा झाली होती. मात्र समाजाच्या हितासाठी अशी हिंसा करणं मला दोष वाटत नाही. राजकारणातल्या अनेक लोकांना तोंडात मारल्याचे दु:ख झाले होते. काहींना रागही आला होता. मात्र त्या युवकाने तोंडात का मारली याचाही विचार व्हायला हवा. पुण्याजवळ मावळमध्ये शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते. त्यांच्यावर गोळीबार झाला, तीन शेतकर्‍यांना आपला प्राण गमवावा लागला त्याचाही राजकारण्यांना राग आला नाही. 1991-92 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री होते आणि वनखात्यात वरिष्ठ अधिकार्‍यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला होता. त्याचे पुरावे माझ्याकडे आले होते, ते पुरावे मी शरद पवारांना दाखवले होते. मात्र चौकशी झालीच नाही....एका थपडेचा राग लोकांना आला. मात्र पूर्ण जीवन समाज आणि देशासाठी अर्पण करणार्‍याला इतका त्रास दिला जातो, याचा राग कोणालाही येत नाही, ही दुदैर्वाची गोष्ट आहे. माझ्या बदनामीसाठी जे हवे ते करा. मात्र राष्ट्रीय संपत्तीचे कधीही नुकसान करू नका. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या आहेत आणि त्या मी माझ्या समाधानासाठी रेकॉर्ड करून ठेवल्या आहेत, त्या ऐकून मला दु:ख न होता समाधानच मिळेल. त्या सीडी वेळ मिळेल तेव्हा जनतेला वाजवून दाखवू. -अण्णा हजारे

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2011 10:33 AM IST

अण्णांचा हिंसाचारालाच पाठिंबा - शरद पवार

07 डिसेंबर

आपल्यावर झालेल्या हल्ल्याचे समर्थन करून अण्णा हजारेंनी हिंसाचाराला पाठिंबा दिलाय अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. अण्णांच्या मनात माझ्याविषयी द्वेष आहे. माझ्यावर पुन्हा शारीरिक हल्ला झाल्यास ती कोणाची चिथावणी असेल ती सांगण्याची गरज नाही अशा शब्दांत शरद पवारांनी अण्णा हजारेंवर टीका केली. काही दिवसांपूर्वी हरविंदर सिंग या माथेफिरु तरुणाने शरद पवारांवर हल्ला केला होता. त्यानंतर अण्णांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन चांगलाच वाद झाला होता. त्यानंतर काल अण्णांनी ब्लॉगमधूनही शरद पवारांवर टीका केली होती. त्याला आज पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. तसेच लोकांनी अण्णांच्या भूमिकेकडे संयमानं पहावं आणि कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करू नये असं आवाहनही शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केलं.

काल ब्लॉगमधून अण्णांनी पवारांवर नेमकी काय टीका केली ?समाज आणि राष्ट्रहितासाठी कठोर शब्दांची हिंसा मी अनेक वर्षे वारंवार करत आलो आहे. 'एकही थप्पड मारा?' हीसुद्धा माझ्याकडून हिंसा झाली होती. मात्र समाजाच्या हितासाठी अशी हिंसा करणं मला दोष वाटत नाही. राजकारणातल्या अनेक लोकांना तोंडात मारल्याचे दु:ख झाले होते. काहींना रागही आला होता. मात्र त्या युवकाने तोंडात का मारली याचाही विचार व्हायला हवा. पुण्याजवळ मावळमध्ये शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते.

त्यांच्यावर गोळीबार झाला, तीन शेतकर्‍यांना आपला प्राण गमवावा लागला त्याचाही राजकारण्यांना राग आला नाही. 1991-92 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री होते आणि वनखात्यात वरिष्ठ अधिकार्‍यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला होता. त्याचे पुरावे माझ्याकडे आले होते, ते पुरावे मी शरद पवारांना दाखवले होते. मात्र चौकशी झालीच नाही.

...एका थपडेचा राग लोकांना आला. मात्र पूर्ण जीवन समाज आणि देशासाठी अर्पण करणार्‍याला इतका त्रास दिला जातो, याचा राग कोणालाही येत नाही, ही दुदैर्वाची गोष्ट आहे. माझ्या बदनामीसाठी जे हवे ते करा. मात्र राष्ट्रीय संपत्तीचे कधीही नुकसान करू नका. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या आहेत आणि त्या मी माझ्या समाधानासाठी रेकॉर्ड करून ठेवल्या आहेत, त्या ऐकून मला दु:ख न होता समाधानच मिळेल. त्या सीडी वेळ मिळेल तेव्हा जनतेला वाजवून दाखवू. -अण्णा हजारे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2011 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close