S M L

रुग्णालयात आगीचा भडका, 88 ठार

08 डिसेंबरकोलकात्यातल्या एएमआरआय (AMRI) हॉस्पिटलला आज पहाटे 3 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत होरपळून 88 जणांचा मृत्यू झाला आहे. यात हॉस्पिटलच्या 3 कर्मचारी सुध्दा दगावले आहे. बेसमेंटमध्ये लागलेली आग बघता बघता अनेक मजल्यांवर पसरली. अनेक रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला. अनेक जण होरपळ्यामुळे त्यांची ओळख पटणंही कठीण झालं आहे. ढाकुरिया भागात हे 161 बेड्सचं हॉस्पिटल आहे. आग लागली तेव्हा हॉस्पिटलमध्ये जवळपास दीडशे रुग्ण दाखल होते. रुग्णांना सोडून हॉस्पिटल कर्मचार्‍यांनी पळ काढला. नातेवाईकांनीच अनेक रुग्णांना बाहेर काढलं. यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोडसुद्धा केली. AMRI हे कोलकत्यातल्या मोठ्या आणि नावजलेल्या हॉस्पिटलपैकी एक आहे. तरीही हॉस्पिलमध्ये आगीपासून संरक्षणासाठी उपाययोजना केलेल्या नव्हत्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली आणि हॉस्पिटलचं लायसन्स रद्द करण्याचे आदेश दिले. तर हॉस्पिटलच्या सहा संचालकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तसेच या आगीत मृत व्यक्तींच्या परिवारांना 5 लाखांची तातडीने मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 2 लाखांची मदत दिली आहे. एएमआरआय हॉस्पिटल हे 161 बेड्सची क्षमता असलेले हॉस्पिटल आहे. ज्या वेळी आग लागली त्यावेळी जवळपास 150 रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होते. प्रत्यक्षदशीर्ंच्या म्हणण्यानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे. हॉस्पिटलच्या या नविन इमारतीमध्ये लागल्या आगीमुळे रुग्णांना जुन्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2011 09:32 AM IST

रुग्णालयात आगीचा भडका, 88 ठार

08 डिसेंबर

कोलकात्यातल्या एएमआरआय (AMRI) हॉस्पिटलला आज पहाटे 3 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत होरपळून 88 जणांचा मृत्यू झाला आहे. यात हॉस्पिटलच्या 3 कर्मचारी सुध्दा दगावले आहे. बेसमेंटमध्ये लागलेली आग बघता बघता अनेक मजल्यांवर पसरली. अनेक रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला. अनेक जण होरपळ्यामुळे त्यांची ओळख पटणंही कठीण झालं आहे. ढाकुरिया भागात हे 161 बेड्सचं हॉस्पिटल आहे. आग लागली तेव्हा हॉस्पिटलमध्ये जवळपास दीडशे रुग्ण दाखल होते.

रुग्णांना सोडून हॉस्पिटल कर्मचार्‍यांनी पळ काढला. नातेवाईकांनीच अनेक रुग्णांना बाहेर काढलं. यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोडसुद्धा केली. AMRI हे कोलकत्यातल्या मोठ्या आणि नावजलेल्या हॉस्पिटलपैकी एक आहे. तरीही हॉस्पिलमध्ये आगीपासून संरक्षणासाठी उपाययोजना केलेल्या नव्हत्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली आणि हॉस्पिटलचं लायसन्स रद्द करण्याचे आदेश दिले. तर हॉस्पिटलच्या सहा संचालकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

तसेच या आगीत मृत व्यक्तींच्या परिवारांना 5 लाखांची तातडीने मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 2 लाखांची मदत दिली आहे. एएमआरआय हॉस्पिटल हे 161 बेड्सची क्षमता असलेले हॉस्पिटल आहे. ज्या वेळी आग लागली त्यावेळी जवळपास 150 रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होते. प्रत्यक्षदशीर्ंच्या म्हणण्यानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे. हॉस्पिटलच्या या नविन इमारतीमध्ये लागल्या आगीमुळे रुग्णांना जुन्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2011 09:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close