S M L

अभियंत्याला मारहाण, 3 मनसे नगरसेवकांवर गुन्हे दाखल

09 डिसेंबरअंबरनाथ मधील काही भागाला गेल्या अनेक महिन्यापासून नियमित पाणी पुरवठा होत नाही. चिखलोली धरणातून या भागाला पाणी पुरवठा होतोय. पण पाच तासाचे भारनियमन असल्याने धरणावर जनरेटर बसवण्यात आलं आहे. धरणावरच्या जनरेटरला डिझेल पुरवठा करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेचे विद्युत अभियंता किशोर देशपांडे यांच्याकडून डिझेल पुरवठा करण्यासंदर्भात कुठलीही ठोस पावले उचलली गेली नाही. आणि संबधीत कुठल्याही विभागाला साधा पत्रव्यवहारही केला नाही असा आरोप नागरिक करत आहे. त्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना उलट उत्तर दिल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी अभियंत्याला मारहाण केली. या प्रकरणात मनसेच्या तीन नगरसेवकांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2011 04:27 PM IST

अभियंत्याला मारहाण, 3 मनसे नगरसेवकांवर गुन्हे दाखल

09 डिसेंबर

अंबरनाथ मधील काही भागाला गेल्या अनेक महिन्यापासून नियमित पाणी पुरवठा होत नाही. चिखलोली धरणातून या भागाला पाणी पुरवठा होतोय. पण पाच तासाचे भारनियमन असल्याने धरणावर जनरेटर बसवण्यात आलं आहे. धरणावरच्या जनरेटरला डिझेल पुरवठा करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेचे विद्युत अभियंता किशोर देशपांडे यांच्याकडून डिझेल पुरवठा करण्यासंदर्भात कुठलीही ठोस पावले उचलली गेली नाही. आणि संबधीत कुठल्याही विभागाला साधा पत्रव्यवहारही केला नाही असा आरोप नागरिक करत आहे. त्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना उलट उत्तर दिल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी अभियंत्याला मारहाण केली. या प्रकरणात मनसेच्या तीन नगरसेवकांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2011 04:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close