S M L

हॉस्पिटल अग्निकांड प्रकरणी संचालकांना 10 दिवसांची कोठडी

10 डिसेंबरकोलकात्यामध्ये एएमआरआय (AMRI) हॉस्पिटलच्या भीषण आगीत लागलेल्या आगीत मृतांचा आकडा 91 वर पोहचला आहे. या प्रकरणी सहा संचालकांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यंाच्यावर निष्काळजीपणाच्या गुन्ह्यासोबत इतर 6 गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. या हॉस्पिटलला लागलेल्या आगीतल्या मृतांची संख्या आता 91 वर पोहोचली आहे. आगीपासून संरक्षण पुरवण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पुर्तता करण्याच्या सुचनांकडे हॉस्पिटलने दुर्लक्ष केलं नसतं तर ही दुर्घटना टाळता आली असती. AMRI हॉस्पिटलमध्ये पुरेशी अग्निशमन यंत्रणा नसल्याचा अहवाल अग्निशमन विभागाने दिला होता. ही यंत्रणा सुधारून घ्यावी अशा सुचना जुलैमध्येच हॉस्पिटलला देण्यात आल्या होत्या. अशी माहिती कोलकात्याचे जॉईंट कमिशनर दमयंती सेन यांनी दिलीय.अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनीही काल घटनास्थळाला भेट दिली. या आगीतल्या जखमींचीही त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2011 04:45 PM IST

हॉस्पिटल अग्निकांड प्रकरणी संचालकांना 10 दिवसांची कोठडी

10 डिसेंबर

कोलकात्यामध्ये एएमआरआय (AMRI) हॉस्पिटलच्या भीषण आगीत लागलेल्या आगीत मृतांचा आकडा 91 वर पोहचला आहे. या प्रकरणी सहा संचालकांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यंाच्यावर निष्काळजीपणाच्या गुन्ह्यासोबत इतर 6 गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत.

या हॉस्पिटलला लागलेल्या आगीतल्या मृतांची संख्या आता 91 वर पोहोचली आहे. आगीपासून संरक्षण पुरवण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पुर्तता करण्याच्या सुचनांकडे हॉस्पिटलने दुर्लक्ष केलं नसतं तर ही दुर्घटना टाळता आली असती. AMRI हॉस्पिटलमध्ये पुरेशी अग्निशमन यंत्रणा नसल्याचा अहवाल अग्निशमन विभागाने दिला होता. ही यंत्रणा सुधारून घ्यावी अशा सुचना जुलैमध्येच हॉस्पिटलला देण्यात आल्या होत्या. अशी माहिती कोलकात्याचे जॉईंट कमिशनर दमयंती सेन यांनी दिलीय.अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनीही काल घटनास्थळाला भेट दिली. या आगीतल्या जखमींचीही त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2011 04:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close