S M L

सरकार झुकले, पंतप्रधान 'लोकपाल'मध्ये ?

11 डिसेंबरजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या एक दिवशीय उपोषणामुळे सरकारला चांगलाच धक्का दिला आहे. अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देत लाखो लोकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला. आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद बघून सरकार झुकलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच अधिवेशनात लोकपाल विधेयक मंजूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंतप्रधान आणि कनिष्ठ नोकरशाहीला लोकपालांच्या कक्षेत आणण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. काही अटींसह पंतप्रधानांना लोकपालाच्या कक्षेत आणायला सरकार तयार आहे. येत्या 19 डिसंेबरला 12 वाजता संसदेमध्ये लोकपाल विधेयक सादर होणार आहे, अशी माहिती आयबीएन नेटवर्कला मिळाली. दरम्यान, एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण संपवताना अण्णांनी पुन्हा एकदा घणाघाती हल्ला चढवला. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी सर्व विरोधी राजकीय पक्षांनी एकत्र यावे असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलं. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत जनलोकपाल साठी लढा देणार असंही अण्णा म्हणाले. या देशातील जनताही मालक आहे, आणि संसदेतले खासदार हे जनतेचे सेवक आहे तसेच पंतप्रधान मनमोहन सिंग कमकुवत आहेत, त्यांचं कुणीही ऐकत नाही असं अण्णा म्हणाले. पंतप्रधानांनी लेखी पत्र देऊनही स्थायी समितीने देशाला धोका दिला. आणि यामागे राहुल गांधीच आहेत, असा आरोप अण्णांनी केला. आपला लढा जनलोकपालवरच संपत नाही, राइट टू रिकॉल, ग्रामसभेला अधिकार, यासारख्या मुद्द्यांवर अजून लढायचं आहे, असा निर्धार अण्णांनी व्यक्त केला. रामलीला मैदानावरचे आंदोलन चिरडण्याचा सरकारचा डाव होता पण तो यशस्वी झाला नाही असं अण्णांनी सांगितलं. अण्णांचे एकदिवशीय उपोषण संपले आहे. उपोषणाची सांगत करतांना अण्णांनी समर्थकांना मार्गदर्शन केलं. जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र उपसले आणि देशभरातील जनता अण्णांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली.आज जंतरमंतरवर अण्णांनी एकदिवशीय उपोषण केलं. आजचे उपोषण हे स्थायी समितीच्या अहवालाच्या निषेधार्थ होते असं अण्णांनी कालच स्पष्ट केलं होतं. अण्णांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधींचे दर्शन घेऊन ध्यानधारणा केली. यानंतर उपोषण स्थळी अण्णा दाखल झाले. आजच्या आंदोलनात विरोधी पक्षांनी अण्णांच्यासोबत व्यासपीठावर हजेरी लावली आणि अण्णांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे असं जाहीर केलं. या वेळी अरुण जेटली, वृंदा करात, शरद यादव, यरन नायडू, ए. बी. बर्धन यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. उपोषणाची सांगता करत असतांना अण्णांनी समर्थकांना मार्गदर्शन केलं. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी आणि सक्षम जनलोकपाल विधेयकासाठी सर्व विरोधी राजकीय पक्षांनी एकत्र यावे असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलं. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत जनलोकपाल साठी लढा देणार असंही अण्णा म्हणाले. या देशातील जनताही मालक आहे, आणि संसदेतले खासदार हे जनतेचे सेवक आहे त्यांना आपणं निवडून दिलं आहे त्यामुळे त्यांनी काम करणे बंधणीय आहेत. पण या नेत्यांनी आपण मालक आहोत असं समजून चुक केली आहे, हे देशाचे दुदैर्व आहे.आज सर्वसामान्य जनतेला भ्रष्टाचारामुळे त्रास भोगावा लागत आहे. मात्र सरकारला याचं काही पडलं नाही. भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढतं चाललंय आहे हे रोखण्यासाठी सरकारची इच्छा नाही म्हणून सक्षम लोकपाल विधेयक आले पाहिजे यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही असंही अण्णांनी पुन्हा स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2011 12:52 PM IST

सरकार झुकले, पंतप्रधान 'लोकपाल'मध्ये ?

11 डिसेंबर

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या एक दिवशीय उपोषणामुळे सरकारला चांगलाच धक्का दिला आहे. अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देत लाखो लोकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला. आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद बघून सरकार झुकलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच अधिवेशनात लोकपाल विधेयक मंजूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंतप्रधान आणि कनिष्ठ नोकरशाहीला लोकपालांच्या कक्षेत आणण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. काही अटींसह पंतप्रधानांना लोकपालाच्या कक्षेत आणायला सरकार तयार आहे. येत्या 19 डिसंेबरला 12 वाजता संसदेमध्ये लोकपाल विधेयक सादर होणार आहे, अशी माहिती आयबीएन नेटवर्कला मिळाली.

दरम्यान, एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण संपवताना अण्णांनी पुन्हा एकदा घणाघाती हल्ला चढवला. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी सर्व विरोधी राजकीय पक्षांनी एकत्र यावे असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलं. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत जनलोकपाल साठी लढा देणार असंही अण्णा म्हणाले. या देशातील जनताही मालक आहे, आणि संसदेतले खासदार हे जनतेचे सेवक आहे तसेच पंतप्रधान मनमोहन सिंग कमकुवत आहेत, त्यांचं कुणीही ऐकत नाही असं अण्णा म्हणाले. पंतप्रधानांनी लेखी पत्र देऊनही स्थायी समितीने देशाला धोका दिला. आणि यामागे राहुल गांधीच आहेत, असा आरोप अण्णांनी केला.

आपला लढा जनलोकपालवरच संपत नाही, राइट टू रिकॉल, ग्रामसभेला अधिकार, यासारख्या मुद्द्यांवर अजून लढायचं आहे, असा निर्धार अण्णांनी व्यक्त केला. रामलीला मैदानावरचे आंदोलन चिरडण्याचा सरकारचा डाव होता पण तो यशस्वी झाला नाही असं अण्णांनी सांगितलं. अण्णांचे एकदिवशीय उपोषण संपले आहे. उपोषणाची सांगत करतांना अण्णांनी समर्थकांना मार्गदर्शन केलं.

जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र उपसले आणि देशभरातील जनता अण्णांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली.आज जंतरमंतरवर अण्णांनी एकदिवशीय उपोषण केलं. आजचे उपोषण हे स्थायी समितीच्या अहवालाच्या निषेधार्थ होते असं अण्णांनी कालच स्पष्ट केलं होतं. अण्णांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधींचे दर्शन घेऊन ध्यानधारणा केली. यानंतर उपोषण स्थळी अण्णा दाखल झाले. आजच्या आंदोलनात विरोधी पक्षांनी अण्णांच्यासोबत व्यासपीठावर हजेरी लावली आणि अण्णांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे असं जाहीर केलं. या वेळी अरुण जेटली, वृंदा करात, शरद यादव, यरन नायडू, ए. बी. बर्धन यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

उपोषणाची सांगता करत असतांना अण्णांनी समर्थकांना मार्गदर्शन केलं. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी आणि सक्षम जनलोकपाल विधेयकासाठी सर्व विरोधी राजकीय पक्षांनी एकत्र यावे असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलं. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत जनलोकपाल साठी लढा देणार असंही अण्णा म्हणाले. या देशातील जनताही मालक आहे, आणि संसदेतले खासदार हे जनतेचे सेवक आहे त्यांना आपणं निवडून दिलं आहे त्यामुळे त्यांनी काम करणे बंधणीय आहेत.

पण या नेत्यांनी आपण मालक आहोत असं समजून चुक केली आहे, हे देशाचे दुदैर्व आहे.आज सर्वसामान्य जनतेला भ्रष्टाचारामुळे त्रास भोगावा लागत आहे. मात्र सरकारला याचं काही पडलं नाही. भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढतं चाललंय आहे हे रोखण्यासाठी सरकारची इच्छा नाही म्हणून सक्षम लोकपाल विधेयक आले पाहिजे यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही असंही अण्णांनी पुन्हा स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2011 12:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close