S M L

कार्टुनिस्ट मारीयो मिरांडा यांचे निधन

11 डिसेंबरप्रसिध्द कार्टुनिस्ट मारीयो मिरांडा यांचे आज गोव्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. द इलस्टेटेड विकली, इकॉनॉमिक टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया सारख्या दैनिकातून त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांद्वारे, गोव्यातल्या जिवनावर भाष्य केलं. कुलाब्यातल्या कॅफे माँडेगारमध्ये मुंबईतील जनजीवनाचे व्यंग्यचित्रांद्वारे केलेलं भव्य भीत्ती चित्र हे जागतिक पातळीवरचा कला अविष्कार म्हणून ओळखलं जातं. व्यंग्यचित्रांव्यतिरीक्त त्यांचा, म्युरल्स कलाशैलीवरसुद्धा तितकाच अधिकार होता. गोवा विथ लव्ह लाफ इट ऑफ ही त्यांची गाजलेली पुस्तकं आहेत. लिलिपुट, मॅड आणि पंच यासारख्या जागतिक पातळीवरच्या व्यंग्यचित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या मॅगझिन्समध्ये मिरांडा यांच्या व्यंग्यचित्रांना प्रसिद्धी मिळाली होती. त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये गोव्यातील सुशेगाद, आयुष्यात आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण झालेले प्रश्न, मिश्किल पद्धतीने सातत्याने मांडण्यात आले.इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया, इकॉनॉमिक्स टाईम्स , टाईम्स ऑफ इंडियामध्ये त्यांची कार्टुन चांगलीच गाजली. त्यांना 1988 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं तर, 2002 मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्कार मिळाला. मिरांडा यांनी करिअरची सुरुवात एका ऍड स्टुडिओ मधून केली. त्यांनी चार वर्ष तिथं काम केलं. त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ व्यंग्यचित्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांना पहिला ब्रेक दिला तो इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियानं. तिथं ते कार्टुनिस्ट म्हणून स्थिरावले. त्यानंतर त्यांनी टाईम्स ऑफ इंडिया, फेमिना मध्ये कार्टुन्स काढायला सुरुवात केली. मिरांडा यांना स्कॉलरशीपमुळे पोर्तुगालमध्ये 1 वर्षे राहण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी इंग्लडमध्ये 5 वर्षे काढली. अमेरिका , जपान ,जर्मनी , स्पेन अशा अनेक देशंामध्ये त्यांच्या चित्रांची आणि स्केचेसची प्रदर्शनं भरली होती. ब्रिटनमध्ये पाच वर्ष काम केल्यानंतर ते मुंबईत परतले आणि पुन्हा आर.के. लक्ष्मण यांच्यासोबत रूजु झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2011 03:01 PM IST

कार्टुनिस्ट मारीयो मिरांडा यांचे निधन

11 डिसेंबर

प्रसिध्द कार्टुनिस्ट मारीयो मिरांडा यांचे आज गोव्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. द इलस्टेटेड विकली, इकॉनॉमिक टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया सारख्या दैनिकातून त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांद्वारे, गोव्यातल्या जिवनावर भाष्य केलं. कुलाब्यातल्या कॅफे माँडेगारमध्ये मुंबईतील जनजीवनाचे व्यंग्यचित्रांद्वारे केलेलं भव्य भीत्ती चित्र हे जागतिक पातळीवरचा कला अविष्कार म्हणून ओळखलं जातं.

व्यंग्यचित्रांव्यतिरीक्त त्यांचा, म्युरल्स कलाशैलीवरसुद्धा तितकाच अधिकार होता. गोवा विथ लव्ह लाफ इट ऑफ ही त्यांची गाजलेली पुस्तकं आहेत. लिलिपुट, मॅड आणि पंच यासारख्या जागतिक पातळीवरच्या व्यंग्यचित्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या मॅगझिन्समध्ये मिरांडा यांच्या व्यंग्यचित्रांना प्रसिद्धी मिळाली होती. त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये गोव्यातील सुशेगाद, आयुष्यात आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण झालेले प्रश्न, मिश्किल पद्धतीने सातत्याने मांडण्यात आले.इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया, इकॉनॉमिक्स टाईम्स , टाईम्स ऑफ इंडियामध्ये त्यांची कार्टुन चांगलीच गाजली. त्यांना 1988 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं तर, 2002 मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्कार मिळाला. मिरांडा यांनी करिअरची सुरुवात एका ऍड स्टुडिओ मधून केली. त्यांनी चार वर्ष तिथं काम केलं.

त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ व्यंग्यचित्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांना पहिला ब्रेक दिला तो इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियानं. तिथं ते कार्टुनिस्ट म्हणून स्थिरावले. त्यानंतर त्यांनी टाईम्स ऑफ इंडिया, फेमिना मध्ये कार्टुन्स काढायला सुरुवात केली. मिरांडा यांना स्कॉलरशीपमुळे पोर्तुगालमध्ये 1 वर्षे राहण्याची संधी मिळाली.

त्यानंतर त्यांनी इंग्लडमध्ये 5 वर्षे काढली. अमेरिका , जपान ,जर्मनी , स्पेन अशा अनेक देशंामध्ये त्यांच्या चित्रांची आणि स्केचेसची प्रदर्शनं भरली होती. ब्रिटनमध्ये पाच वर्ष काम केल्यानंतर ते मुंबईत परतले आणि पुन्हा आर.के. लक्ष्मण यांच्यासोबत रूजु झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2011 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close