S M L

इटलीची वाईन मुंबईत लाँच

19 नोव्हेंबर, मुंबई विशाल परदेशी देशात सगळ्यात मोठी इंडस्ट्री म्हणून वायनरीजकडेही पाहिलं जातं. महाराष्ट्रात या वाईन उद्योगानं मोठा पसारा वाढवलाय. या परिस्थितीकडे आकर्षित होऊन इटलीतील फिर्‍यागामो फॅमिली इस्टेट वाईन्सने आपली चार वाईन लेबल्‌स भारतात लाँच केली आहे. इटलीचे वाईन उद्योजक सेल्वेतोर फिर्‍यागामो द्राक्षाची वाईन भारतीय मार्केटमध्ये आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत. कधी काळी ते फॅशन दुनियेत डिझायनर असणारे सेल्वेतोर वाईनच्या इतक्या प्रेमात पडले की त्यांनी इटलीत स्वत:ची वाइनरी सुरू केली. ' मला विश्वास वाटतो की, या वाईन्स भारतीय लोकांना फार आवडतील. मी सध्या नफ्या तोट्याचा विचार करत नाही. माझ्यासमोर एकच ध्येय आहे आणि ही वाईन चाहत्यांच्या पसंतीस उतरवणं', असं सेल्वेतोर फिर्‍यागामो सांगत होते.स्वत:च्या फॅमिली इस्टेटमधील वाईन भारतात लाँच करणं, हे सेल्वेतोरचं स्वप्न होतं. पण एवढं सगळं करणं त्याला एकट्याला शक्य नव्हतं. त्याकरता त्याने मदत घेतली. फाईन वाईनसमोअरची. ही कंपनी एक मार्केटिंग कंपनी आहे. फिर्‍यागामो इस्टेट वाईन्सने फाईन वाईनसमोअरच्या माध्यमातून इल बोरो, कॅस्टीग्लीऑन डेल बोस्को, व्हाईट वाईन लेमीली, चार रेड वाईन त्यामध्ये ली बोरा, पाएन डी नोवा, रोशो डी मॉनटॅलसिनो आणि ब्रुनिलो डी मॉनटॅलसिनो ही रेंज समोर आणली. ह्या रेंजच लॉन्चिंग पहिलं महाराष्ट्रातच का करण्यात आलं, यावर उत्तर होतं, मुंबई हे वाईनच मोठ मार्केट आहे. फाइनवाईनसमोअर सीईओ धरती देसाई सांगत होत्या. आता राहिला प्रश्न या वाईनसच्या किमतींचा तर मूळात श्रींमंत पेय असण्यार्‍या या वाईनच्या किमती सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात कधीच नव्हत्या.पण म्हणतात ना इच्छेला मोल नसतं..

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2008 02:50 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2008 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close