S M L

छत्तीसगड निवडणुकीत अजित जोगींची अस्तित्वाची लढाई

19 नोव्हेंबर, छत्तीसगडब्युरो रिपोर्ट छत्तीसगड राज्यातील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते अजित जोगींनी आपल्या पत्नीसह अवघं राज्य पिंजून काढलंय. त्यांना काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणायचंय. व्हीलचेरवर असलेल्या अजित जोगींनी अवघा छत्तीसगड प्रचारासाठी पिंजून काढला आहे. मागील निवडणुकामध्ये जोगींना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातच स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडल्यानंतर त्यांना पक्षानंही निलंबित केलं होतं. दरम्यान, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि आता जोगी पुन्हा पक्षासाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. प्रचारादरम्यान, जोगींबरोबर त्यांच्या पत्नी डॉ. रेणूही जोगी ही मदत करत आहेत. जनसेवेसाठी जोगींनी सरकारी नोकरी सोडली होती. आता आपलं मेडिकल करिअर सोडून डॉ. रेणूही जोगींना मदत करत आहेत. ' जर काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तर पुढील मुख्यमंत्री कोण असेल, हे अध्यक्षा सोनिया गांधी आणि विधानसभा सदस्यच ठरवतील ', असं डॉ. रेणू जोगी सांगत होत्या. पतीचा संदेश घेऊन रेणू घरोघरी जात आहेत. जोगींचा मारवाही मतदारसंघ असो की रेणू यांचा स्वतःचा कोटा. कुठेही मोठमोठ्या रॅली नाहीत. फक्त विभागवार बैठकांवर जोर देण्यात आलाय. त्यांनी काँग्रेस मतदारांची ओळखपत्र बनवलीयत. जोगींचे मतदार एकाच मोठ्या परिवाराचे सदस्य आहेत, अस त्यांचं म्हणण आहे. प्रचंड बहुमतानं जिंकून येऊ असा अजित जोगींना विश्वास आहे. छत्तीसगडच्या निवडणुकांच्या निमित्तान जोगी दांम्पत्य कुटुंबाच्या राजकीय प्रतिष्ठेसाठी धडपड करताना दिसतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2008 02:53 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2008 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close