S M L

रुपया पुन्हा घसरला

13 डिसेंबरडॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत पुन्हा एकदा घसरली आहे. रुपयाचा डॉलरच्या तुलनेतला भाव आज 53.48 पर्यंत गेला. आतापर्यंतचा हा सगळ्यात निचांक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमधल्या वेगवेगळ्या क्षेत्रांची प्रगती दाखवणारी आकडेवारी काल प्रसिद्ध झाली होती. ही आकडेवारी गेल्या 28 महिन्यातला सगळ्यात कमी दर दाखवणारी आहे. आणि याचाच परिणाम रुपयाच्या दरावर पहायला मिळतोय. घसरणारी अर्थव्यवस्था पाहता परकीय गुंतवणूकदार भारतातून आपला पैसा काढून घेत असल्याने रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत घसरत चालला आहे. जगभरातल्या इतर चलनांच्या तुलनेत रुपयाची कामगिरी खराब आहे. बाकी सगळ्या चलनांच्या किंमतींमध्ये डॉलरच्या तुलनेत 1 ते 2 टक्क्यांची घसरण झाली. रुपयाचे मूल्य गेल्या दोन दिवसांतच 1.2% घसरलेलं आहे. 2011 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत रुपयाचे मूल्य 14 टक्के घसरले. ऑगस्ट 2011 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव होता 44 रुपयांवर.रुपयातली घसरण...- इतर चलनांमध्ये 1 - 2% घसरण- रुपयात गेल्या दोन दिवसांत 1.2% घसरण- 2011 मध्ये रुपयाचा भाव 14% घसरला- ऑगस्ट 2011 मध्ये एका डॉलरचं मूल्य 44 रुपये. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव घसरल्याने त्याचा कुणावर कसा परिणाम होणार ?याचा फायदा भारतीय निर्यातदारांना होईल कारण त्यांना आता जास्त पैसे मिळतील. सोबतच परदेशातून भारतात पैसे पाठवणार्‍यांना फायदा होईल. कारण भारतामध्ये जास्त पैसे हातात येतील. तर याचा फटका बसेल इम्पोर्टर्सना..कारण डॉलरसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. भारतामध्ये कच्च तेलही मोठ्या प्रमाणावर आयात होतं, त्यामुळे पेट्रोलच्या किंमतींवर याचा परिणाम होईल. यासोबतच परदेश प्रवास आणि परदेशात शिक्षण घेणंही महाग होईल

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2011 05:22 PM IST

रुपया पुन्हा घसरला

13 डिसेंबर

डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत पुन्हा एकदा घसरली आहे. रुपयाचा डॉलरच्या तुलनेतला भाव आज 53.48 पर्यंत गेला. आतापर्यंतचा हा सगळ्यात निचांक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमधल्या वेगवेगळ्या क्षेत्रांची प्रगती दाखवणारी आकडेवारी काल प्रसिद्ध झाली होती. ही आकडेवारी गेल्या 28 महिन्यातला सगळ्यात कमी दर दाखवणारी आहे. आणि याचाच परिणाम रुपयाच्या दरावर पहायला मिळतोय. घसरणारी अर्थव्यवस्था पाहता परकीय गुंतवणूकदार भारतातून आपला पैसा काढून घेत असल्याने रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत घसरत चालला आहे. जगभरातल्या इतर चलनांच्या तुलनेत रुपयाची कामगिरी खराब आहे. बाकी सगळ्या चलनांच्या किंमतींमध्ये डॉलरच्या तुलनेत 1 ते 2 टक्क्यांची घसरण झाली. रुपयाचे मूल्य गेल्या दोन दिवसांतच 1.2% घसरलेलं आहे. 2011 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत रुपयाचे मूल्य 14 टक्के घसरले. ऑगस्ट 2011 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव होता 44 रुपयांवर.रुपयातली घसरण...

- इतर चलनांमध्ये 1 - 2% घसरण- रुपयात गेल्या दोन दिवसांत 1.2% घसरण- 2011 मध्ये रुपयाचा भाव 14% घसरला- ऑगस्ट 2011 मध्ये एका डॉलरचं मूल्य 44 रुपये.

डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव घसरल्याने त्याचा कुणावर कसा परिणाम होणार ?याचा फायदा भारतीय निर्यातदारांना होईल कारण त्यांना आता जास्त पैसे मिळतील. सोबतच परदेशातून भारतात पैसे पाठवणार्‍यांना फायदा होईल. कारण भारतामध्ये जास्त पैसे हातात येतील. तर याचा फटका बसेल इम्पोर्टर्सना..कारण डॉलरसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. भारतामध्ये कच्च तेलही मोठ्या प्रमाणावर आयात होतं, त्यामुळे पेट्रोलच्या किंमतींवर याचा परिणाम होईल. यासोबतच परदेश प्रवास आणि परदेशात शिक्षण घेणंही महाग होईल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2011 05:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close