S M L

दूध संघाच्या कुस्तीत भारतीय मल्लांची बाजी

14 डिसेंबरकोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर इथं झालेल्या आंतराष्ट्रीय कुस्ती मैदानात परदेशी मल्लांना चित करत भारतीय मल्लांनी बाजी मारली. खचाखच भरलेल्या मैदानामध्ये वारणा साखर केसरीसाठी हिंद केसरी रोहीत पटेल आणि रशियांच्या ऑलिम्पिक रौप्यविजेता तैमुराझ तिगीव्ह यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. यात तैमुराझला नमवत रोहीत पटेलने मानाचा वारणा केसरी किताब पटकावला. तर जनसुराज्य केसरीसाठी अर्जुन ऍवार्ड विजेता राजू तोमर आणि रशियाच्या युरोपीयन चॅम्पियन बसीव रुस्लान हा हरवत हा मान पटकावला. दरम्यान वारणा दूध संघ केसरीचा किताब डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहास पाटील यानं रशियाच्या युरोपियन चॅम्पियन वादीम लालीव्ह याला नमवून पटकावलं. तर तात्यासाहेब कोरे दूध साखर वाहतूक केसरीचा किताब पंजाबचा हिंद केसरी कुष्णकुमार याने आपल्या प्रतिस्पर्थी जागतीक चॅम्पियन ऍलेग कलागोव्ह याला चित करुन पटकावला. वारणा उद्योग समुहाचे संस्थापक तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वारणानगर इथं आंतराष्ट्रीय कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो कुस्ती शौेकीनांच्या उपस्थितीत जवळपास 500 च्यावर लहान मोठ्या कुस्त्या इथं पार पडल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2011 02:20 PM IST

दूध संघाच्या कुस्तीत भारतीय मल्लांची बाजी

14 डिसेंबर

कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर इथं झालेल्या आंतराष्ट्रीय कुस्ती मैदानात परदेशी मल्लांना चित करत भारतीय मल्लांनी बाजी मारली. खचाखच भरलेल्या मैदानामध्ये वारणा साखर केसरीसाठी हिंद केसरी रोहीत पटेल आणि रशियांच्या ऑलिम्पिक रौप्यविजेता तैमुराझ तिगीव्ह यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. यात तैमुराझला नमवत रोहीत पटेलने मानाचा वारणा केसरी किताब पटकावला. तर जनसुराज्य केसरीसाठी अर्जुन ऍवार्ड विजेता राजू तोमर आणि रशियाच्या युरोपीयन चॅम्पियन बसीव रुस्लान हा हरवत हा मान पटकावला.

दरम्यान वारणा दूध संघ केसरीचा किताब डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहास पाटील यानं रशियाच्या युरोपियन चॅम्पियन वादीम लालीव्ह याला नमवून पटकावलं. तर तात्यासाहेब कोरे दूध साखर वाहतूक केसरीचा किताब पंजाबचा हिंद केसरी कुष्णकुमार याने आपल्या प्रतिस्पर्थी जागतीक चॅम्पियन ऍलेग कलागोव्ह याला चित करुन पटकावला. वारणा उद्योग समुहाचे संस्थापक तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वारणानगर इथं आंतराष्ट्रीय कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो कुस्ती शौेकीनांच्या उपस्थितीत जवळपास 500 च्यावर लहान मोठ्या कुस्त्या इथं पार पडल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2011 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close