S M L

झिपरू मुकणे हत्याप्रकरणाची होणार सीआयडी चौकशी

14 डिसेंबरठाणे जिल्ह्यातील रामदास शंकर वळवी आणि झिपरू मुकणे या दोन आदिवासी वेठबिगार कामगारांच्या हत्येप्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे. वीटभट्टी मालक बाळू चौधरी यानं झिपरू मुकणे यांची 21 नोव्हेबरला हत्या केली होती. फक्त 6 हजार रुपयाचे कर्ज त्याने परत केलं नसल्याने त्याचा अमानुष छळ करुन त्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर प्रसार माध्यमांनी हा विषय उचलून धरला होता. तर रामदार वळवी याची काही दिवसांपुर्वी हत्या करण्यात आली होती. हायकोर्टानेे मीडियातील आलेल्या बातम्यांची दखल घेत स्वताहून याचिका दाखल करुन सीआयडी चौकशीचे आदेश राज्य सरकारला दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2011 02:34 PM IST

झिपरू मुकणे हत्याप्रकरणाची होणार सीआयडी चौकशी

14 डिसेंबर

ठाणे जिल्ह्यातील रामदास शंकर वळवी आणि झिपरू मुकणे या दोन आदिवासी वेठबिगार कामगारांच्या हत्येप्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे. वीटभट्टी मालक बाळू चौधरी यानं झिपरू मुकणे यांची 21 नोव्हेबरला हत्या केली होती. फक्त 6 हजार रुपयाचे कर्ज त्याने परत केलं नसल्याने त्याचा अमानुष छळ करुन त्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर प्रसार माध्यमांनी हा विषय उचलून धरला होता. तर रामदार वळवी याची काही दिवसांपुर्वी हत्या करण्यात आली होती. हायकोर्टानेे मीडियातील आलेल्या बातम्यांची दखल घेत स्वताहून याचिका दाखल करुन सीआयडी चौकशीचे आदेश राज्य सरकारला दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2011 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close