S M L

'लंडन ऑलिम्पिकवर बहिष्कार घालणार नाही'

15 डिसेंबरलंडन ऑलिम्पिकवर बहिष्कार घालायचा नाही असा निर्णय अखेर भारतीय ऑलिम्पिक समितीने घेतल्याची सुत्रांची माहिती आहे. डाऊ केमिकल्स कंपनी ऑलिम्पिकची मुख्य प्रायोजक कंपनी आहे. आणि या कंपनीचा भोपाळ वायुगळती दुर्घटनेशी थेट संबंध आहे. या कंपनीने अजूनही दुर्घटनेतल्या पीडितांना नुकसान भरपाईही दिलेली नाही. वायुगळतीच प्रकरण गंभीर असल्यामुळे डाऊ कंपनीचं प्रायोजकत्व रद्द करावे अशी मागणी भारताबरोबरच इतर काही देशातही होत होती. पण बहिष्कार घालण्याची टोकाची भूमिका घेऊ नये असं भारतीय ऑलिम्पिक समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज ठरवण्यात आल्याचं समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2011 05:58 PM IST

'लंडन ऑलिम्पिकवर बहिष्कार घालणार नाही'

15 डिसेंबर

लंडन ऑलिम्पिकवर बहिष्कार घालायचा नाही असा निर्णय अखेर भारतीय ऑलिम्पिक समितीने घेतल्याची सुत्रांची माहिती आहे. डाऊ केमिकल्स कंपनी ऑलिम्पिकची मुख्य प्रायोजक कंपनी आहे. आणि या कंपनीचा भोपाळ वायुगळती दुर्घटनेशी थेट संबंध आहे. या कंपनीने अजूनही दुर्घटनेतल्या पीडितांना नुकसान भरपाईही दिलेली नाही. वायुगळतीच प्रकरण गंभीर असल्यामुळे डाऊ कंपनीचं प्रायोजकत्व रद्द करावे अशी मागणी भारताबरोबरच इतर काही देशातही होत होती. पण बहिष्कार घालण्याची टोकाची भूमिका घेऊ नये असं भारतीय ऑलिम्पिक समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज ठरवण्यात आल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2011 05:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close