S M L

ध्यानचंद आणि सचिनच्या 'भारतरत्न'चा मार्ग खुला

16 डिसेंबरभारत देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न आता क्रीडा पटूंना देण्याचा प्रस्ताव मान्य झाला आहे. भारतरत्न पुरस्कारासाठी नियमावलीत बदल करण्यात आले आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ हॉकीपटू ध्यानचंद यांना भारत रत्न देण्याचा मार्ग खुला झाला आहे. आता सर्व क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी ही नवी व्याख्या पुरस्कारासाठी लागू होणार आहे. गृहमंत्रालयाने हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला होता. तो प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाने मंजूर केला आहे. यापुर्वी केवळ कला, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रात चांगली कामगीरी बजावणार्‍यास हा पुरस्कार देण्यात येत होता. एक आठवड्यापुर्वीच पंतप्रधान कार्यालयाने प्रस्ताव मंजूर केला आहे.सचिन तेंडुलकरला भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करावे की करू नये यावर गेली वर्ष दोन वर्ष बराच खल झाला. सचिनची देदीप्यमान कामगिरी भारत रत्न पुरस्कारास साजेशी असली तरी पुरस्काराचे नियम त्याच्या आड येत होते. पुरस्काराच्या पात्रता निकषानुसार खेळाडू या पुरस्कारास पात्र नव्हते. पण आता हे अडथळे दूर झाले आहे.सचिनला भारतरत्नाने सन्मानित करावे यासाठी राजकीय पक्षांतही चढाओढ लागली होती. प्रजासत्ताक दिनी जेव्हा पद्म पुरस्कार जाहीर झाले तेव्हाही या मागणीने जोर पकडला होता. अवघा देश सचिनच्या बाजूने होता. भारत रत्न पुरस्काराच्या या शर्यतीत केवळ सचिनचे नव्हता. सचिनसोबत हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांनाही पुरस्कार देण्याची मागणी पुढे आली होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि क्रीडा मंत्री माकन यांनीही या मागणीला पाठिंबा दिला होता. यामुळेचं ध्यानंचद यांनाही मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येण्याची शक्यता आहे. जगभारत तिरंग्याला सन्मान मिळवून देणार्‍या क्रीडापटूंचाही भारत रत्न पुरस्काराने सन्मान करावा अशी मागणी गेली कित्येकवर्ष क्रीडा संघटक करीत होते. नियमानुसार, भारत रत्न पुरस्कारासाठी पंतप्रधान थेट राष्ट्रपतींना शिफारस करतात. स्वरभास्कर भीमसेन जोशी हे या पुरस्काराचे शेवटचे मानकरी. येत्या ऑगस्टमध्ये आता या भारत रत्नांच्या पंक्तीत सचिनसह ध्यानचंद यांचाही समावेश होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2011 09:43 AM IST

ध्यानचंद आणि सचिनच्या 'भारतरत्न'चा मार्ग खुला

16 डिसेंबर

भारत देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न आता क्रीडा पटूंना देण्याचा प्रस्ताव मान्य झाला आहे. भारतरत्न पुरस्कारासाठी नियमावलीत बदल करण्यात आले आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ हॉकीपटू ध्यानचंद यांना भारत रत्न देण्याचा मार्ग खुला झाला आहे. आता सर्व क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी ही नवी व्याख्या पुरस्कारासाठी लागू होणार आहे. गृहमंत्रालयाने हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला होता. तो प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाने मंजूर केला आहे. यापुर्वी केवळ कला, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रात चांगली कामगीरी बजावणार्‍यास हा पुरस्कार देण्यात येत होता. एक आठवड्यापुर्वीच पंतप्रधान कार्यालयाने प्रस्ताव मंजूर केला आहे.

सचिन तेंडुलकरला भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करावे की करू नये यावर गेली वर्ष दोन वर्ष बराच खल झाला. सचिनची देदीप्यमान कामगिरी भारत रत्न पुरस्कारास साजेशी असली तरी पुरस्काराचे नियम त्याच्या आड येत होते. पुरस्काराच्या पात्रता निकषानुसार खेळाडू या पुरस्कारास पात्र नव्हते. पण आता हे अडथळे दूर झाले आहे.

सचिनला भारतरत्नाने सन्मानित करावे यासाठी राजकीय पक्षांतही चढाओढ लागली होती. प्रजासत्ताक दिनी जेव्हा पद्म पुरस्कार जाहीर झाले तेव्हाही या मागणीने जोर पकडला होता. अवघा देश सचिनच्या बाजूने होता.

भारत रत्न पुरस्काराच्या या शर्यतीत केवळ सचिनचे नव्हता. सचिनसोबत हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांनाही पुरस्कार देण्याची मागणी पुढे आली होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि क्रीडा मंत्री माकन यांनीही या मागणीला पाठिंबा दिला होता. यामुळेचं ध्यानंचद यांनाही मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येण्याची शक्यता आहे.

जगभारत तिरंग्याला सन्मान मिळवून देणार्‍या क्रीडापटूंचाही भारत रत्न पुरस्काराने सन्मान करावा अशी मागणी गेली कित्येकवर्ष क्रीडा संघटक करीत होते. नियमानुसार, भारत रत्न पुरस्कारासाठी पंतप्रधान थेट राष्ट्रपतींना शिफारस करतात. स्वरभास्कर भीमसेन जोशी हे या पुरस्काराचे शेवटचे मानकरी. येत्या ऑगस्टमध्ये आता या भारत रत्नांच्या पंक्तीत सचिनसह ध्यानचंद यांचाही समावेश होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2011 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close